आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामांच्या दर्जात सुधारणा केल्यास पुढचा विचार, नरेंद्र महाराजांनी साधुग्राम पाहिल्यावर व्यक्त केली नाराजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुंभमेळ्यासाठी साधुग्राममध्ये सुरू असलेल्या कामांबाबत अनेक स्तरांवर नाराजीचा सूर व्यक्त होत असून, खुद्द पालकमंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केली अाहे. मात्र, कायदा हातात घेता येत नाही. त्यामुळे या कामांच्या दर्जात सुधारणा झाल्यास महंत ग्यानदास महाराजांसमवेत चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचा इशारा नाणीज पीठाचे नरेंद्र महाराज यांनी दिला अाहे.
कुंभमेळ्यातील कामांच्या पाहणीसाठी नाशिक दाैऱ्यावर अालेल्या नरेंद्र महाराजांनी गुरुवारी पत्रकारांशी वार्तालाप केला, त्या वेळी ते बाेलत हाेते. साधुग्रामसाठीचे पत्रे हलक्या दर्जाचे, तर शाैचालयाची भांडीदेखील खूप छाेट्या अाकाराची वापरण्यात अाली असल्याचेही नरेंद्र महाराजांनी नमूद केले. बुधवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांनीदेखील पाहणी करून नाराजी व्यक्त केली अाहे. शासनाने चांगल्या प्रमाणात निधी देऊनदेखील विकास साधण्यात अालेला नाही. केवळ निधी खर्च करण्यासाठी कुंभाची कामे उरकली जात असून, अशा निकृष्ट कामांना केवळ प्रशासनच जबाबदार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अन्य घाटांकडे जाणार नाहीत भाविक : भाविकांचीश्रद्धा रामकुंडावरच अाहे. मात्र, प्रशासनाने लांबच लांब घाट बांधून ठेवले अाहेत. पण, स्थानमाहात्म्याला मोठे महत्त्व असते. त्यामुळे अन्य घाटांकडे फार कमी भाविक जातील, असे वाटते. नदी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत असून, त्यात अाम्हीदेखील याेगदान देणार अाहाेत. अामच्या भक्तांना एकत्रित करून शांतिदूतांचे दल उभे करणार असल्याचे नरेंद्र महाराजांनी सांगितले.

अारक्षण झाल्यास कुंभमेळा अशक्य
कुंभमेळ्याच्याजागेसाठी अाताच कायमस्वरूपी अारक्षण केल्यास पुढील कुंभमेळा भरविणेच अशक्य हाेणार अाहे. शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडे अकरा वर्षे ठेवून कुंभमेळ्याच्या वर्षभर अाधी त्या जमिनी त्यांनी प्रशासनाकडे द्याव्यात. मात्र, त्यावर काेणतेही बांधकाम करू नये, यासाठी त्यांच्यावर बंधन घालावे, असे निवेदन अाम्ही प्रशासनाला दाेन वर्षांपूर्वी दिले हाेते, असेही नरेंद्र महाराज यांनी या पाहणी दौऱ्यावेळी बोलताना नमूद केले.
फोटो -साधुग्रामची पाहणी करताना नरेंद्र महाराज. समवेत इतर साधू-महंत आदी.