आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्रची लाेकप्रियता घटली, देवेंद्रची वाढली; भाजपच्या अहवाल पुस्तिकेतील नाेंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी (फाइल फोटो ) - Divya Marathi
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी (फाइल फोटो )
नाशिक - भारतीय जनता पक्षातील नमाे समर्थकांचे प्रमाण सन २०१३-१४ मध्ये ४० टक्के हाेते, दाेनच वर्षात म्हणजे २०१६ मध्ये ही संख्या २५ टक्क्यापर्यंत घटली अाहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांची संख्या २५ टक्क्यांपर्यंत गेली अाहे. तसेच पक्षातील कार्यकर्त्यांचे प्रमाण दाेन वर्षापूर्वी ४५ टक्के हाेते ते अाता १५ टक्यांवर अाले अाहे. भाजपच्या अहवालातूनच हे वास्तव समाेर अाले अाहे.

भारतीय जनता पक्षाच्या वाॅर रूमने प्रसिद्ध करण्यात अालेली ही अहवाल पुस्तिका नाशिकमध्ये झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत रविवारी मुख्यमंत्र्यांसह उपस्थितांना देण्यात अाली. त्यात पक्षाचा प्रभाव, भाजपकडे पाहण्याचा लाेकांचा बदलता कल, काम हाेत असलेले अाठ महत्त्वाचे विभाग, वाॅर रूमच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना केले जाणारे सहाय्य, ‘अापले सरकार’ तक्रार निवारण प्रणाली याची माहिती देण्यात अाली अाहे. वरकरणी अतिशय अाकर्षक दिसणारी ही पुस्तिका कार्यकर्त्यांची माहितीची भूक भागविण्याएेवजी संभ्रमावस्था वाढविणारी ठरली अाहे. यातील ‘भाजपकडे लाेकांचा बदलता कल’ या सदराखाली दिलेली माहिती भाजपच्या नेतृत्वाला अात्मपरीक्षण करण्यास लावणारी अाहे.

ही तर ब्रॅण्ड व्हॅल्यू : या संदर्भात संबंधित पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ही पुस्तिका प्रेससाठी नसून केवळ निमंत्रित सदस्यांसाठीच असल्याचे सांगण्यात अाले. तसेच यातील अालेख हे ब्रॅण्ड व्हॅल्यू दर्शविणारे असल्याचे सांगण्यात अाले. परंतु ही ब्रॅण्ड व्हॅल्यू म्हणजे काय, ती कशी ठरविली जाते याची माहिती मात्र देण्यात
अाली नाही.

...थेट माेदींबराेबर तुलना
लाेकसभा निवडणुकीनंतर माेदींचा प्रभाव भारतभर वाढने त्याची चिंता विराेधी पक्षाला वाटणे स्वाभाविक अाहे. परंतु पक्षातीलच लाेकांनाच जर ही चिंता वाटत असेल अाणि अापणही कसे माेदींच्या समतुल्य अाहाेत हे दर्शविले जात असेल तर विराेधी पक्षाला अाता फार काम करण्याची गरज नाही. भाजपच्या अहवाल पुस्तिकेत ही बाब प्रकर्षाने जाणवते. अालेखाद्वारे तुलना करताना नमाे समर्थक अाणि फडणवीस समर्थक कसे समतुल्य अाहेत असे दर्शविण्यात अाले अाहे. ही तुलना नक्की कशासाठी केली, कार्यकर्त्यांनी त्यातून नक्की काेणता धडा घ्यावा याची माहिती मात्र त्यात नाही. केंद्र अाणि राज्य सरकारमधील ही स्पर्धा तर नसेल असा प्रश्न म्हणूनच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडताे.
पुढील स्लाइडमध्ये, मंत्र्यांना दूषणे देण्यापेक्षा कामे लाेकांपर्यंत पाेहोचवा