आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी: उगवता जागतिक राजकीय नेता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकारणातील ‘स्टार’च्या रूपात पुढे आलेल्या नव्या पंतप्रधानांना भारत बदलायचा आहे.
दि. २६ मे, २०१५ मध्ये आपल्या कार्यकाळाचे एक वर्ष पूर्ण करणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाच्या पटलावरील राजकीय स्टारच्या स्वरूपात आपले स्थान निश्चित केले आहे. ते रात्री फक्त तीन तास झोप घेतात. दिनक्रम योगाद्वारे सुरू करतात. ६४ वर्षीय मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर ट्विटरवर सर्वाधिक फॉलॉअर असलेले राजकीय नेते आहेत. माेदींनी ११ महिन्यांत १६ देशांना भेट दिली आहे. त्यांनी कार्यकाळातील पहिले वर्ष पूर्ण होईपर्यंत ते चीन, दक्षिण कोरिया, मंगोलिया अशा एकूण १९ देशांचा दौरा केलेला असेल. ग्लोबल स्तरावर भक्कमपणे पाय रोवणाऱ्या उत्साही व्यक्तीच्या रूपात स्वत:ला सादर केले आहे, असे हार्वर्ड ग्लोबल युनिव्हर्सिटीमधील केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये कार्यरत अमेरिकेचे माजी विदेश अवर सचिव निकोलस बर्न्स यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, देशवासीयांना गेल्या वर्षी दिलेल्या आश्वासनांमुळे ते सत्तारूढ झाले. सध्या जवळपास भारतीय लोकसंख्येच्या अर्धी लोकसंख्या २५ वर्षांपेक्षा कमी आहे. १९९०च्या सुरुवातीला आर्थिक सुधारणांनी देशाला मोठ्या विकासदराच्या वाटेवर नेले होते. २००१च्या दशकाच्या शेवटी विकास दर सरासरी ७.५ टक्के होता.
गेल्या वर्षी निवडणुकांच्या आधी भारतीय अर्थव्यवस्था दोलायमान स्थितीत होती. विकास दर पाच टक्क्यांपर्यंत खाली आला होता. दर वर्षी नोकरीची मागणी करणाऱ्या करोडो भारतीयांसाठी रोजगार निर्माण करण्यासाठी हा विकास दर फार कमी होता. दहा वर्षे पंतप्रधान राहिलेले मनमोहन सिंग हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हातचे बाहुले असल्याच्या रूपात दिसले. ते राहुल गांधी यांनी सत्ता सांभाळेपर्यंत वेळकाढूपणा करत होते. घराणेशाही असलेली काँग्रेस पार्टी चुकल्यासारखे वाटते. गेल्या वर्षी निवडणुकांच्या वेळी लोकांचा असा समज झाला होता की, सध्याच्या सरकारची ऊर्जा आणि कल्पनाशक्ती संपली आहे. ते सरकार फक्त नावाला आहे, असे विल्सन सेंटर, वाॅशिंग्टनमध्ये आशिया कार्यक्रमाचे माजी अध्यक्ष रॉबर्ट हॅथवे यांचे म्हणणे आहे. आणि तेव्हा भारतीय जनता पक्षाचे वादातीत नेते नरेंद्र मोदी समोर आले. त्यांनी देशभरात उत्साह अभियान छेडले. आणि गुजरातची प्रगती जनतेसमोर मांडली. मोदी आणि त्यांच्या समर्थकांनी भारताच्या आर्थिक स्थितीला ऊर्जितावस्था देण्यासाठी गुजरात मॉडेल समोर ठेवले. कार्नेगी अांतरराष्ट्रीय शांती संस्थानचे असोसिएट मिलन वैष्णव म्हणतात, आधीसुद्धा पंतप्रधान झाले आहेत. मात्र, हे आहे प्रगतीचे मॉडेल आणि ते मला पुढे न्यायचे आहे, असे कुणीच सांगितले नव्हते.
गेल्या वर्षी निवडणुका जिंकल्यानंतर कुणालाच माहिती नव्हते की, मोदी जागतिक पटलावर काय करतील? पंतप्रधान होताच त्याचे उत्तर समोर आले. त्यांनी त्यांच्या शपथविधीला पाकिस्तानसह दक्षिण आशियातील नेत्यांनाही निमंत्रण दिले होते. त्यांनी वर्षभरात विदेशात भारताचा प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न केला. मोदी मार्चमध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यावर होते. ३० वर्षांत श्रीलंकेत जाणारे ते पहिले पंतप्रधान आहेत. मोदी महान आणि चांगले नेते असल्याचे श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना म्हणतात.
१९९० मध्ये आर्थिक सुधारणा लागू होण्यापूर्वी अमेरिकेने भारताशी जवळचे संबंध केले होते. मोदी व्हिसा प्रतिबंधामुळे आपल्याशी दुजाभाव तर करणार नाहीत ना, हा प्रश्न अमेरिकेसमोर होता. २००२मधील गुजरात दंग्यांनंतर अमेरिकेने मोदींना व्हिसा नाकारला होता. हॅथवे यांचे म्हणणे आहे की, मोदी कडवटपणा बाळगतील. त्यामुळे भारत- अमेरिका संबंध ताणले जातील, अशी शक्यता वाटत होती. मात्र, मोदींनी व्यवहाराला महत्त्व दिले आणि अमेरिकेशी संबंध मजबूत करण्याला विशेष प्राधान्य दिले.
मोदींनी टाइमला सांगितले की, भारत-अमेरिका स्वाभाविक सहकारी आहेत. भारत आणि अमेरिका मिळून जगासाठी काय करू शकतील, हे आपण पाहणे गरजेचे आहे. प्रश्न आहे दोन्ही देश काय करू शकतील? भारत कधीही अमेरिकेचे प्रमुख व्यापारी सहकारी राहिलेला नाही. अमेरिकेच्या विदेश व्यापारात भारताचा वाटा दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. आर्थिकरीत्या मजबूत भारत अमेरिकन कंपन्यांसाठी योग्य व्यापारपेठ ठरू शकतो. ते नावीन्याची वाट पाहत असलेल्या ग्लोबल अर्थव्यवस्थेच्या पुढे जाऊ शकतात. भारतासाठी अमेरिका नवीन गुंतवणुकीचा महत्त्वपूर्ण स्रोत होऊ शकते. ओबामा यांच्याशी असलेले मोदींचे संबंध विदेशात भारताचा प्रभाव वाढवण्यासाठी मदतीचे ठरू शकतात.
काही महत्त्वपूर्ण पावले...
मोदीसरकारने भारतीय अर्थव्यवस्थेला उदार बनविण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. उदाहरणार्थ- विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला प्राधान्य िदले. पंतप्रधानांनी सुस्त अधिकाऱ्यांना सक्षम करण्यासाठी उपाययोजना केली आहे. व्यापारात गतिरोध बनणाऱ्या स्थानिक करांऐवजी वस्तू सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आला आहे. मोदी राज्यांतील स्पर्धेव्दारे विकासाला चालना देत आहेत. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्यांना अधिकार देण्याची योजना असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. यादरम्यान राजस्थानने व्यापारासाठी अनुकूल नियम बनवले आहेत. श्रम कायदा शिथिल केला आहे.
प्रभाव फिका पडत आहे
दुसरीकडे मोदी सरकारच्या भूमी अधिग्रहण कायद्याविरोधात विरोधी पक्षांनी मोहीम छेडली आहे. विरोधकांनी मोदींना उद्योगपतींचे समर्थक आणि गरिबांचे विरोधक असे संबोधले आहे.यामुळे भाजपला राज्यांतील निवडणुकांत नुकसान होऊ शकते. मोदींची अजिंक्य वाटणारी राजकीय परिस्थिती फिकी पडण्याला सुरुवात झाली आहे. दिल्ली निवडणुकांमध्ये मोदी स्टार प्रचारक असूनही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले.
भारताबाबत उत्साह
सुधारणाअभियानाबाबत मोदींनी गेल्या वर्षी निवडणुकांच्या दरम्यान आलेल्या मरगळीच्या तुलनेत आर्थिक स्थितीत आलेल्या बदलाचा उल्लेख केला. ते म्हणतात, जगभरात पुन्हा एकदा भारत आणि त्याच्या संधीबाबत उत्साह आहे. मला पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे. माझ्याकडे एका वर्षासाठी नाही तर पाच वर्षांसाठी योजना आहेत. गेल्या वर्षभरात आम्ही जे केले ते त्या योजनेचा एक भाग आहे. पुढील चार वर्षांत एकामागे एक आमचे उपाय समोर येतील. गतकाळात जगभरात भारत आणि त्याच्या छुप्या संधींबाबत उत्सुकता होती; मात्र त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाल्याने निराशाजनक स्थिती आली. असे पुन्हा होऊ नये, अशी अपेक्षा भारतीय नागरिक करीत आहेत.
त्यांना या अभियानात यश मिळेल का?
सोशल मीडियावर मोदींची धूम आहे. ट्विटरवर त्यांचे एक कोटी २० लाख फॉलोअर आहेत. फेसबुकवर त्यांना दोन कोटी ८० लाख लाइक्स मिळाल्या आहेत.
मैत्रीचे जग, लाखो फॉलोअर, आर्थिक मंदीशी झगडणाऱ्या जगातील चमकता तारा
गेल्याएक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचे चित्र बदलले आहे. मात्र, हे फक्त मोदींच्या प्रयत्नांनीच झालेले नाही. मार्चमध्ये आंतरराष्ट्रीय मुद्रा कोशच्या प्रबंध संचालक क्रिस्टीन लेगार्ड यांनी भारताला पुसट ग्लोबल क्षितिजावरील एक चमकता तारा असल्याचे म्हटले होते. महागाई कमी झाली आहे. ग्लोबल इंधनाच्या किमतीत नाटकीय उतारांनी आपल्या गरजेनुसार ८० टक्के कच्च्या इंधनाची आयात करणाऱ्या देशाला दिलासा मिळाला आहे. एकेकाळी आर्थिक यश आणि शक्यता असणारे रशिया आणि ब्राझीलच्या तुलनेत भारत सरस वाटत आहे.
विकासाचे तत्त्वज्ञान
जानेवारीतभारत दौऱ्यादरम्यान, नवी दिल्ली येथे आपल्या शेवटच्या सार्वजनिक कार्यक्रमात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले की, जर भारत धर्माच्या मुद्यावर विभागला गेला नाही तर प्रगती करत राहील. जोपर्यंत तो एकसंघ राहील, कुठल्याही प्रकारे विभागला गेला नाही तर प्रगती करेल. ओबामांच्या या वक्तव्याबाबत विचारल्यानंतर मोदींनी सांगितले की, भारतीय सभ्यतेची विविधता गौरवशाली आहे. आम्हाला त्याच्यावर गर्व आहे. माझे, माझ्या पक्षाचे आणि माझ्या सरकारचे तत्त्वज्ञान ‘सबका साथ सबका विकास’ हे आहे.

मोदींनी पंतप्रधानपदाच्या आपल्या पहिल्या वर्षाच्या काळात जगातील मुख्य नेत्यांची भेट घेतली. त्यात चीनचे शी जिन पिंग, रशियाचे पुतिन अाणि जर्मनीच्या अंगेला मर्केल यांचा समावेश आहे. बराक ओबामा भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत.
खासगी आयुष्या संदर्भात मोदी झाले भावुक
नवीदिल्लीतील आपल्या सरकारी निवासस्थानी ‘टाइम’सोबत दोन तास मुलाखत देणारे मोदी मुलाखतीच्या शेवटी आश्चर्यकारकपणे आपल्या खासगी आयुष्याबाबत सांगू लागले. त्यांना विचारण्यात आले की, त्यांच्यावर सर्वाधिक प्रभाव कुणाचा आहे, ते काही सेकंद शांत झाले. नंतर म्हणाले, मी गरीब परिवारात जन्मलो. लहानपणी रेल्वेत चहा विकायचो. माझी आई घर चालविण्यासाठी लोकांची धुणी-भांडी करायची. छोटी-मोठी घरगुती कामे करायची. हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले. डोळे पुसत त्यांनी सांगितले लहानपण गरिबीत गेले आहे. गरिबीचाच माझ्यावर पहिला प्रभाव आहे, असे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...