आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतर्कता - नागरी सुरक्षा दल स्थापन करणार ; आता उच्चभ्रूंचेही प्रबोधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस दलाकडून निरनिराळे उपक्रम हाती घेतले जात असताना झोपडपट्टय़ांपाठोपाठ आता गंगापूररोड व कॉलेजरोड भागातील उच्चभ्रू वसाहतीतील रहिवासी सोसायट्यांमध्ये देखील नागरिकांना घराबाहेर बोलावून त्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे.
पोलिस उपआयुक्त साहेबराव पाटील, सहायक आयुक्त गणेश शिंदे यांनी यासंदर्भात पुढाकार घेत शनिवारी सकाळपासूनच रहिवासी क्षेत्रातील सोसायट्यांमध्ये फिरून रहिवाशांना एकत्रित करून मार्गदर्शन केले. नगरसेवक अजय बोरस्ते यांनी पोलिस अधिकार्‍यांशी संपर्क साधून मंगलनगर परिसरातील इंद्रायणी कॉम्प्लेक्स येथे बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत उपायुक्त पाटील यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत काय काळजी घेतली पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले. सुरुवातीला घरफोड्या रोखण्यासाठी घरातून बाहेर पडताना सोसायटीचे सुरक्षारक्षक आणि शेजार्‍यांच्या कुटुंबीयांना सांगितले पाहिजे. चार-आठ दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस बाहेर जायचे असल्यास घरात मौल्यवान दागिने, रोकड न ठेवता बॅँकेच्या लॉकर्समध्ये ठेवावे, असेही आवाहन पाटील यांनी केले. सहायक आयुक्त शिंदे यांनी सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी महिलांनी दक्ष राहून किमान दुचाकीचा क्रमांक बघून तत्काळ कळवावे. सोसायटी परिसरात अथवा उद्यानच्या भागात कोणी मुलींची छेड काढत असेल, मद्यपी गोंधळ घालत असल्यास पोलिसांना दूरध्वनीद्वारे कळवावे, असेही आवाहन या वेळी करण्यात आले. याप्रसंगी शशिकांत लेले, किसनलाल छोरिया, रमेश बोरस्ते, पप्पू कटारे, साई पाटील, किरण भामरे, समीर पाराशरे, चित्रा सोनवणे आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
या भागात सोसायट्यांना दिल्या भेटी : महात्मानगर, कॉलेजरोड, सर्मथनगर,