आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashi Municipal Cororation Election Shiv Sena Bjp, Congress Ncp

नाशकात आघाडी व युतीकडून स्वतंत्र मुलाखती; इच्छुक संभ्रमात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक: एकीकडे शिवसेना व भाजप युतीत चर्चेचे गुर्‍हाळ सुरू असताना दुसरीकडे कॉँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली असतानाही सर्वच पक्षांनी स्वतंत्ररित्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू करण्याचा फॉर्म्युला वापरल्यामुळे संभ्रमावस्था वाढली आहे. परिणामी जागा वाटपात पत्ता तर कट होणार नाही या भीतीने इच्छुकांना ग्रासून टाकले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी कॉँग्रेसने राष्ट्रवादीसोबत आघाडी केली, तर सेना व भाजपाची युती होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. एकीकडे युतीसाठी प्रयत्न होत असून, दुसरीकडे मात्र, भाजपाने 122 प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. सेनेनेही भाजपप्रमाणेच 21 जानेवारीपासून आपल्याही पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेण्याची घोषणा केली आहे. अशीच परिस्थिती कॉँग्रेस व राष्ट्रवादीतही आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी गुरुवारी मध्यरात्री झाली मात्र, तत्पूर्वी राष्ट्रवादीने 122 प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यामुळे कॉँग्रेसही अस्वस्थ झाली आहे. कॉँग्रेसनेही 21 जानेवारीपासून महापालिका निवडणुकीतील सर्व प्रभागातून इच्छुकांची चाचपणी करण्यासाठी मुलाखतीची प्रक्रिया घेण्याची घोषणा केली आहे. एखाद्या पक्षाकडून मुलाखत दिली आणि आघाडी वा युतीच्या बोलणीत संबंधित जागा मित्रपक्षाला मिळाली तर, उमेदवारीसाठी अडचण असल्यामुळे नेमके काय करायचे या चिंतेने इच्छुकांना ग्रासून टाकले आहे. दुसरीकडे मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर, उमेदवारीसाठी विचार होणार नसल्यामुळे निमूटपणे इच्छुकांना आपल्याशी संबंधित पक्षाकडून मुलाखतीसाठी प्रय} सुरू केले आहेत.