आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक विमानतळ: गाेएअर-एचएएलमध्ये सकारात्मक चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पर्यायी विमानतळ म्हणून नाशिक विमानतळावरून सेवा सुरू करता यावी, याकरीता ‘गाे एअर’ च्या मागणीबाबत बुधवारी बैठक झाली. एचएएलच्या स्थानिक अधिकाऱ्यांसह गाेएअरच्या एअरपाेर्टसचे उपाध्यक्ष कमल किकाणी अधिकाऱ्यांनी या बैठकीत चर्चा केली, जी सकारात्मक राहिली. अाता अशाप्रकारच्या सेवेकरिता उभयतांमध्ये एक संयुक्त करार हाेणार अाहे, यानंतर या सेवेचा मार्ग माेकळा हाेणार असल्याची माहिती खासदार हेमंत गाेडसे यांनी दिली.

पर्यायी विमानतळ म्हणून नाशिक विमानतळाचा पर्याय विमानसेवा कंपन्यांना दिला गेला अाहे, मुंबईतील अतिरिक्त वाहतुकीमुळे लॅण्डिंग किंवा पार्किंगकरिता जागा मिळाली नाही, तर अहमदाबाद किंवा सुरत विमानतळाचा पर्याय विमान कंपन्यांपुढे असताे. मात्र, यासाठी माेठ्या प्रमाणावर इंधन वेळ खर्च हाेताे. हाच वेळ नाशिक विमानतळावरून अशी सेवा सुरू झाल्यास वाचू शकणार असल्याकडे विमान कंपन्यांचे लक्ष वेधले जात अाहे. नाइट लॅण्डिंगसाठी जरी नाशिक विमानतळाला पसंती दिली गेली तरी प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी त्याचा फायदा हाेणार अाहे.

यामुळेच या विमानतळावरून अशी सेवा सुरू हाेणे गरजेचे असल्याचे मानले जाते. नाशिक विमानतळाला नुकतीच डीजीसीएने मान्यता दिली असून हे विमानतळ एअरमॅपवर अाले अाहे. यामुळेच गाेएअरकडून पर्यायी विमानतळ म्हणून नाशिकमधून सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव एचएएलकडे काही दिवसांपूर्वी दिला गेला हाेता. ताे या बैठकीच्या माध्यमातून करार करण्याचा निर्णय घेतला गेल्याने सकारात्मकरित्या पुढे सरकला असल्याचे खासदार गाेडसे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...