आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळ एचएएलच्या ताब्यात; दीड महिन्यात सेवेसाठी प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेला नाशिक विमानतळ आणि टर्मिनस इमारत अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने एचएएलकडे सुपूर्द केले. यावेळी एचएएलने सर्वच साेयीसुविधा याेग्य पद्धतीने सुरू आहेत की नाही याची तपासणी करूनच विमानतळ ताब्यात घेतले. जिल्हाधिका-यांनीही दीड महिन्यात सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मानस व्यक्त केल्याने लवकरच विमानसेवा सुरू होण्याची शक्यता वाढली आहे.

धार्मिक सिटी ते उद्योगनगरी, वाइन कॅपिटल आणि एज्युकेशन हब म्हणून आणि मुंबई-पुण्यानंतर सर्वात वेगाने विकसित होणा-या नाशिक शहरातून विमानसेवा सुरू होण्याची मागणी केली जात होती. त्याची जबाबदारीही सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वीकारत वर्षभरापूर्वीच विमानतळ उभारले. राज्य शासनाने एचएएलच्या मालकीच्या जागेत त्याची उभारणी केली. त्यामुळे हे विमानतळ एचएएलकडे सुपूर्द करताना त्यापोटी शासनाला मोबदला मिळावा या कारणाने विमानतळ हस्तांतरणास तब्बल वर्षभराचा कालावधीची प्रतीक्षा करावी लागली. प्रकल्पाचे काम केलेले सहायक अभियंता श्याम मिसाळ उपस्थित हाेते. त्यांनीच हा प्रकल्प पूर्णपणे हाताळला असल्याने त्यांचीच नियुक्ती शासनाने यासाठी केली होती. त्यामुळे वेगाने सुरू झालेल्या या प्रक्रियेअंतर्गत अखेर बुधवारी त्याचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या उपस्थितीत हस्तांतरण झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. साळुंके, विद्युतचे एस. बी. जमदाडे यांनी कागदपत्रे सुपूर्द केली.

सीसीटीव्हीदुरुस्त करावे लागणार : ठरल्यानुसारएचएएलने सर्वच बाबींची तपासणी केली. अपूर्ण किंवा तात्पुरत्या स्वरूपात बंद असलेल्या सेवांची यादी सार्वजनिक बांधकामकडे दिली. त्यात तीन कॅमेरे बंद असून, ते सुरू करण्याची तसेच डीएमएस सिस्टिम सुरू करून देण्याचे नमूद केले.

विमानतळाची वैशिष्ट्ये
>राज्यशासन आणि एचएएलच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वाकांक्षी प्रकल्प
>नाशिकचे अंतर मुंबईपासून अहमदाबादपेक्षा कमी. इंधन दरही ३० टक्के कमी, पार्किंग दरही कमी असल्याने हाॅपींग फ्लाइटला संधी.
>सार्वजनिक बांधकामने केलेला राज्यातील पहिलाच प्रकल्प.
>संयुक्त समितीमार्फत कॅनडाच्या मे. स्टॅनटेक बर्टहिल्स लि. या अंातरराष्ट्रीय सल्लागारमार्फत इमारतीची आखणी, संरचना पर्यवेक्षण नेमणूक.
>प्रत्यक्ष काम या समितीकडून काढून घेत सार्वजनिक बांधकामकडे सुपूर्द केल्याने ९० लाख रुपयांची बचत झाली.
>विदेशी बनावटीचे साहित्याऐवजी देशी साहित्य वापरून तेवढ्याच दर्जाची इमारत उभारली.
>इमारतीच्या दोन्ही बाजूने डबल ग्लास युनिट काचेचा वापर. उष्णता ध्वनिरोधक काचा असून, त्यामुळे वातावरण आल्हाददायक राहणार आहे.

एचएएलकडे हस्तांतरण पूर्ण
नाशिकच्या विकासासाठी विमानतळ हा महत्त्वाचा प्रकल्प असून, आता येथून दीड महिन्यात विमानसेवाही सुरू करण्याचा प्रयत्न आहे. एचएएल काही विमान कंपन्यांसोबत चर्चा करत आहे. मीही शासनाच्या माध्यमातून सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी

प्रत्येक बाबींची एचएएलकडून पाहणी
सार्वजनिकबांधकाम विभागाने उभारलेल्या टर्मिनस इमारतीसह तेथे उभारलेल्या सर्वच बाबींची एचएएलने पाहणी केली. त्यातील नळांच्या कॉकपासून, विजेच्या बाबी, एसीसह उपलब्ध असलेल्या सर्वच सेवा त्यांनी सुरू करून पाहिल्या. टाईल्स, फ्लोअर, इमारतीचे क्षेत्रफळ यांचीही त्यांनी पाहणी मोजणी केली.

असे आहे विमानतळ
८२६७ चौ.मी. इमारतीचे क्षेत्रफळ
१३.५० मीटर इमारतीची उंची
३०० दरराेज प्रवाशी क्षमता
६० कोटीची बांधकामात बचत