आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळ वापरास लवकर इ-निविदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक विमानतळाच्या हस्तांतरणाचा तिढा बुधवारी, (दि. ८) सुटण्याची चिन्हे अाहेत. बुधवारपर्यंत विमानतळाचे हस्तांतरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हिंदुस्तान एराेनॉटिकल लिमिटेडकडे (एचएएल) करण्याचे अादेश अतिरिक्त सचिव डाॅ. पी. एस. मिणा यांनी दिलेले असून याकरीता विशेष बैठकही हाेत अाहे. दरम्यान, हस्तांतरण प्रक्रियेनंतर लागलीच एचएएलकडून विमानतळ हाताळणी (अाॅपरेशन्स) करीताच्या निविदा काढल्या जाणार अाहेत. खुल्या प्रकारातील या निविदा अाॅनलाइन प्रक्रियेतून भरता येणार असून निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली अाहे.

विमानतळाचे हस्तांतरण अाणि त्यानंतर लागलीच हाेणार असलेल्या विमानतळ अाॅपरेशन्स करीताची निविदा प्रक्रिया यामुळे कुंभमेळ्याच्या काही कालावधीपूर्वीच नियिमत विमानसेवा नाशिककरांना मिळू शकणार अाहे. राज्य शासनाने कागदाेपत्री नााशिक विमानतळ अद्यापही एचएएलकडे हस्तांतरण करण्यास बराच वेळ गेल्याने विमानतळ अाॅपरेशन्सकरीताच्या निविदांना अगाेदरच वेळ झाला असून त्याचा फटका मात्र विमानसेवेची मागणी करणा-या नाशिककरांना बसताे अाहे.

दुसरीकडे एचएएलकडून ‘डीजीसीए’ कडे विमानतळाच्या परीसराचे नकाशे यापूर्वीच अपलाेड करण्यात अाल्याने हे विमानतळ जागतिक नकाशावर पुढील दाेन महिन्यांत खुले हाेणार होईल.

गृहमंत्रालयाकडे सुरक्षेचा प्रस्ताव
ओझर येथील विमानतळावर सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठीचा प्रस्ताव याआधीच गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात अालेला अाहे. लवकरच ताे प्रस्तावही मार्गी लागणार असून नाशिककरांना कुंभमेळ्यापूर्वी विमानसेवेचा लाभ घेता येणार आहे. हेमंतगाेडसे, खासदार

एक महिन्याचा उशीर
विमानतळावरबांधकाम ठेकेदाराने केलेल्या अाेल्या पार्टीनंतर राज्यभरातून सरकारवर टीकेची झाेड उठली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने विमानतळ हस्तांतरणासाठी अादेश दिले. डाॅ. मिणा यांनी नाशिकमध्ये बैठक घेत २८ मार्चपर्यंत विमानतळ एचएएलकडे हस्तांतरण करण्याचे अादेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले हाेते. मात्र, महिना उलटूनही हे अादेश पाळले गेले नाहीत.