आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: 26 तासानंतर आग आटोक्यात, कंपनी जळून खाक, दीड लाख लिटर इथेनॉल नष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोंदे औद्योगिक वसाहतीतील कंपनीमध्ये लागलेल्या आगीमुळे दूरवरूनही अशा ज्वाला दिसत होत्या. - Divya Marathi
गोंदे औद्योगिक वसाहतीतील कंपनीमध्ये लागलेल्या आगीमुळे दूरवरूनही अशा ज्वाला दिसत होत्या.
नाशिक- गोंदे औद्योगिक वसाहतीत असलेल्या एआरएसएस बायोफ्यूअल या केमिकल कंपनीत इथेनॉलच्या दोन टाक्यांचा स्फोट होऊन लागलेली आग 26 तासानंतर अखेर आग विझवण्यात यश आले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत दीड लाख लिटर इथेनॉल जळून खाक झाले आहे. सोबतच एआरएसएस बायो फ्युएल कँपनी खाक झाली. आगीचे कारण स्पष्ट झाले नसून बुधवारी दुपारी एकच्या सुमारास लागलेली आग 24 तासानंतरही आगडोंब सुरुच होती. मागील 24 तासात 75 अग्निशमन फोम बंब वापरूनही आग आटोक्यात आली नव्हती. अखेर भारत पेट्रोलियम, एचएएल, महिंद्रा आदी कंपनीच्या अधिकारी घटनास्थळी पोहचले व त्यांनी ज्वाईंट ऑपरेशन राबवून  26 तासानंतर आग आटोक्यात आणली. सुमारे 100 फोम बंब वापरल्यानंतर ही आग आटोक्यात आली.
 
व्हीटीसी फाटा ते बेलगाव रस्त्यावरील लष्करी हद्दीलगत असलेल्या एआरएसएस बायोफ्यूअल या केमिकल कंपनीतील इथेनॉलच्या एक लाख लिटर क्षमतेच्या इंधन टाकीचा बुधवारी दुपारी 12 वाजून 55 मिनिटांनी स्फोट झाला होता. त्यामुळे तीन ते चार किलोमीटरच्या परिसरात मोठा हादरा बसला. काही घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. थोड्यावेळाने दुसऱ्या टाकीचाही स्फोट झाला. 
 
वाडीवऱ्हे पोलिसांनी रस्ता वाहतुकीस बंद करत अग्निशामक दलाला पाचारण केले. मुंढेगाव येथील जिंदाल कंपनी, नाशिक महानगरपालिका घोटी टोलनाका येथील अग्निशामक दलाच्या वाहनांकडून आग आटोक्यात आटोक्यात येत नव्हती. या आगीत एकून दीड लाख लिटर इथेनॉल नष्ट झाले आहे. तसेच एआरएसएस बायो फ्युएल कँपनी जळून खाक झाली आहे.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, नाशिकमधील या कंपनीला लागलेल्या आगीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...