आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेऱ्या कॅनव्हासवर बहरला शुष्क गाेदाघाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - हिरवीगार सृष्टी.. निळेशार पाणी... पक्ष्यांचे थवे... उत्साहाने बहरलेले चेहरे अन् एकूणच निसर्गदत्त सौंदर्य हे टिपण्याला कुणाला नाही आवडणार... चित्रकार तर अशा सौंदर्याला कॅनव्हासवर चितारण्यासाठी आतूर असतात, पण कुणी शुष्कतेत जर सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न केला तर? नाशिक आर्ट सोसायटीच्या उद्घाटनानिमित्त पाडव्याच्या सकाळी नाशिकच्या नामांकित चित्रकारांनी काेरड्या पडलेल्या गोदाघाटाचे सौंदर्य आपल्या कॅनव्हासवर रेखाटले. विशेष म्हणजे पाडव्यानिमित्त गाेदाघाटात टँकरद्वारे पाणी साेडण्यात अाले हाेते. त्यामुळे चित्रकारांना काही प्रमाणात का हाेईना हायसे वाटले.
सध्या पाण्याअभावी गोदेचे पात्र पूर्णतः कोरडे झाले आहे. या पात्राच्या शुष्कतेतून सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न या मंडळींनी पाडव्याला केला. पाडव्यानिमित्त थाेडेफार पाणी साेडण्यात अाल्याने चित्रकारांनी या संधीचा फायदा उचलत घाटाला चित्रबद्ध केले. या चित्रांचे प्रदर्शनही अहिल्यादेवी व्यायामशाळा सभागृहात झाले.

नाशिकअार्ट साेसायटीचे उद््घाटन नाशिकचेचित्रकार आणि कलारसिक एकत्र येऊन ‘दि नाशिक आर्ट सोसायटी'ची स्थापना पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात अाली. त्यानिमित्त चित्रांचा हा सोहळा रंगणार आहे. ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार आणि चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य दिनकर जानमाळी यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन झाले. यावेळी अामदार सीमा हिरे, महेश हिरे, भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, सुरेश पाटील, गिरीश पालवे, प्राचार्य बाळ नगरकर, डी. व्ही. मुळे, प्रा. अनिल अभंग, मुक्ता बालिगा, महाले, चित्रकार नीलेश भारती, संजय दुरगवाड, ज्ञानेश्वर डांबले, हर्षद पाचाेरकर, जयेश बाेरसे, रुद्रा मजेठिया, ज्याेती चव्हाण, द्वीप रत्नाकर, अतुल भालेराव, निवेदिता पाेद्दार, साेनल अांबेकर, अंबादास नागपुरे, राहुल पगारे, श्याम जाधव, राजन श्रीराम, अनिकेत महाले, हरी धाेंगडे, अार्किटेक्ट चंद्रशेखर पाटील, धिवरे अादी उपस्थित हाेते.
अादिवासींनाही वाव
^"दरमहिन्याला चित्रकार एकत्र येऊन प्रत्यक्ष निसर्गचित्रण करणार आहेत. प्रात्यक्षिके, स्लाईड शो, कार्यशाळा, आर्ट फिल्म दाखविणे अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आदिवासी आश्रमातील विद्यार्थ्यांच्याही कलागुणांना वाव संस्थेच्या वतीने देण्यात येणार आहे.’ - दिनकर जानमाळी, प्राचार्य,चित्रकला महाविद्यालय
कला दालनासाठी प्रयत्न
^बॉम्बेआर्ट सोसायटी, दिल्ली आर्ट सोसायटी आणि आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या धर्तीवर नाशिकमध्येही अशी सोसायटी असावी या दृष्टीने संस्था सुरू करण्यात अाली अाहे. शहरातील चित्रकार आहेत. पण, त्यांच्या कलेला अजूनही हक्काचे व्यासपीठ नाही. शहरात सुयोग्य कलादालन सुरू व्हावे म्हणून सोसायटी प्रयत्न करणार आहे. - शिशिर शिंदे, प्रसिद्धचित्रकार