आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा हजार ‘फिट’; तितक्याच ‘अनफिट’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याच्या न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील सहा हजार रिक्षांना हे मीटर बसवण्यात आले असून, आणखी जवळपास तितक्याच रिक्षा या मीटरविना आहेत. मीटरची ‘पासिंग’ करून घेण्यासाठी आरटीओ कार्यालयात शनिवारी रिक्षांच्या रांगा लागल्या होत्या. ऑटोरिक्षा परवानाधारकांच्या सोयीसाठी इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीटर बसवून योग्यता प्रमाणपत्रांच्या नूतनीकरणासाठी रविवारीदेखील प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहणार असून, कारवाई टाळण्यासाठी मीटर बसवून घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांनी केले आहे.