आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शाही’ बॅण्डच्या शाेधात साधू-महंत, दादांनी पाच सिंहस्थ वाजवले अन‌् गाजवलेही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एकेकाळी बॅण्डसाठी प्रसदि्ध असलेल्या नाशिकमध्ये आज नावालाच एक-दाेन बॅण्ड पथक उरलेले आहेत. त्यातही सराव कमी असल्याने कुंभमेळ्यातील शाही मिरवणुकीत वाजवण्यास त्या पथकांना महंत अपात्र ठरवतात. त्यामुळे साधुग्राममध्ये दाखल आखाडे, खालशांकडून चांगल्या बॅण्ड पथकांची शोधमोहीम सुरू आहे.

साधुग्राममध्ये साधूंचा थाट काही औरच. विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी आलिशान शामियाने उभारण्यात आले आहेत. प्रशासनाने पुरविलेल्या सोयी -सुविधांनंतरही साधूंना हव्या तशा सुविधांचे काम या शामियान्यांमध्ये सुरू आहे. एकूणच हे तिन्ही आखाडे आणि इतर खालशांमधील साधू-महंतांचा थाट हा ‘शाही’ असाच आहे. त्यामुळे आपला आखाडा वा खालसा याची मिरवणूकही शाहीच व्हावी, यासाठी साधू आग्रही आहेत. सजलेले घोडे, उंट, हत्तीवरील अंबाऱ्यांसह या मिरवणुका निघणार आहेत. पण, वाजत-गाजत निघणाऱ्या या मिरवणुकांसाठी बॅण्ड पथकच हवे तसे मिळत नसल्याचे अनेक साधूंनी सांगितले. दिगंबर आखाड्यात तर बॅण्डची आॅडिशनच झाली. पण, त्यातून एकही बॅण्ड साधूंच्या पसंतीस उतरला नाही. त्यामुळे पुन्हा शोध सुरू झाला. यासंदर्भात दिगंबर आखाड्याचे महंत म्हणाले की, ‘यहाँ पे बॅण्ड होता है की नहीं... कुछ भी लेके आते हैं और बजाते हैं... एक बॅण्डवाला तो हार्मोनियम लेके आया.. यहाँ पे क्या शादी है... इतना बडा शहर और बॅण्ड भी नहीं मिलता..’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तर, इतर खालशांमध्येही हीच ओरड आहे. बँजो, डीजेच्या आजच्या जमान्यात बॅण्ड मिळणं तसं कठीणच. पण, महंतांची मिरवणूक अर्थातच आध्यात्मिक आणि पारंपरिक त्यामुळे त्यांची मागणी बॅण्डलाच आहे. जर मनासारखे बॅण्ड नाही मिळाले तर काय करावे, असा प्रश्न या साधूंना आता पडला आहे.

दादा काय परंपरा होती नाशिक बॅण्डची?
{मलाआठवतं पूर्वी भिकन, हामक, खडकाळी यांचे बॅण्ड प्रसदि्ध होते. एका वादकाने आधी वाजवायचे त्यानंतर इतरांनी साथ द्यायची. जरतारी कपडे, एका रांगेत चालण्याची शिस्त, कोणतेही व्यसन नसणे, मागणीनुसार गाणी, क्वचितच एखादी सुपारी घेतली, वाजवणे यामुळे एक काळ नाशिकने बॅण्डच्या बाबतीत वाजवला आहे. त्यामुळेच पुण्याच्या बरोबरीने आपले नाव घेतले जायचे.
म्हणजेत्या काळात स्पर्धा अशी नव्हतीच

{होतीना... मुसलमानांच्या काही बॅण्डमुळे त्यांची मक्तेदारी झाली होती. म्हणून मग व्यायामशाळांचे बॅण्ड पथक उदयाला आले. तरुण ऐक्य मंडळ व्यायामशाळा, नरसिंह, मधली होळी, यशवंत, गुलालवाडी या व्यायामशाळांमधील वदि्यार्थ्यांचे बॅण्ड पथक तयार झाले. मी स्वत: सात-आठ वर्षे बॅण्ड शिकवायचो. तेव्हा स्पर्धा अन‌् सहकार्यही होते. मुलं हौसेने वाजवाचे. त्यातून त्या मुलांची कला जोपासली जात होती आणि व्यायामशाळांनाही पैसा मिळत होता.

कितीपैसे मिळायचे तेव्हा...
{सुरुवातीलामला आठवतं, ११ रुपये मिळायचे. वेळेचे बंधन नाही. त्यातही ओळखीचे असतील तर फुकटच वाजवलं जायचं. नंतर मग १५ रुपये तास यानुसार मानधन सुरू झालं. एखाद्या श्रीमंताने दविसभराची सुपारी दिली तर १००-१५० रुपये घेतले जायचे. पुढे हे मानधन ५० रुपये तासांपर्यंत आले, पण बॅण्ड चालायचे.

मगदादा तुम्ही किती वर्षे बॅण्डमध्ये होते?
{मी७-८ वर्षे अनेक बॅण्ड पथकांना शिकवलं. नंतर आमचाच वजिय बॅण्ड सुरू केला. १५ वर्षे तो मी चालवला. पण, दोन-तीन वेळा माझी वाजवितानाच मारामारी झाली. मग माझ्या मुलांनीच सांगितलं, दादा तुम्ही शहरातील खूप प्रतिष्ठित लोकांमध्ये वावरतात. बॅण्ड वाजवणं वाईट नाही, पण अशा घटना वाईट आहेत. तेव्हापासून मी बॅण्ड सोडला. आता तर लांबून जरी एखादा बॅण्ड बघितला तरी अंगावर काटाच येतो.

तुमच्याकाही आठवणी...
{बऱ्याचआठवणी आहेत. मी १३ वर्षांचा असतानापासून बॅण्ड वाजवतो. मी लहानच होतो तेव्हा एका आखाड्यात वाजवत होतो. साधू-महंत तलवारीचे, त्यांच्या हत्यारांचे खेळ करायचे तेव्हाच आम्हाला वाजवावे लागायचे. त्या हत्यारांची, साधूंची त्या काळात भीती वाटायची. दुसरी एक आठवण म्हणजे एका आखाड्याची मिरवणूक घेऊन निलगिरी पर्वतावर घेऊन जायचे होते. ते साधू म्हणाले, काहीही झाले तरी वाजवणे बंद करायचे नाही. आता एवढा डोंगर चढायचा म्हणजे श्वास लागणार. पण, त्यांनी बजावलंच होतं की, काहीही वाजवत राहा आणि आम्ही वाजवतच राहिलो. आणखी एक आठवण म्हणजे एक साधू शास्त्रीय गायकच होते. सुरुवातीला त्यांनी मला बोलावलं. आम्ही वाजवून दाखवलं. ते म्हणाले की, काही शास्त्रीय वाजवा. मग मी म्हणालो, महाराज सध्या तुम्ही शिकवा. पुढल्या पर्वणीला वाजवून दाखवीन आणि बरोबर दुसऱ्या पर्वणीला आम्ही शास्त्रीय गाणी वाजवली.

५० हजार रुपयांपर्यंत घेतले जाते मानधन
केवळ मिरवणूक म्हणून वा नृत्यासाठी हे बॅण्ड नको असतात, तर साधू हे मिरवणुकीत खेळ करत असतात. त्यात तलवारबाजीसारखे थरारक खेळही होतात. त्यासाठी एक ताल असतो, तो तालही या बॅण्ड पथकाला वाजवता आला पाहजिे.


का हवा वैशिष्ट्यपूर्ण बॅण्ड...
बॅण्ड पथकातील वाद्ये
{क्लॅरिओनेट{ ट्रम्पेट { सॅक्सोफोन { भंपक { युफोनियम { टुम्बोन { बेस क्लेरिओनेट { टेनर (मोठा सॅक्सोफोन) { हाॅट टेनर (सर्वात मोठा सॅक्सोफोन, पाच ते सात फूट) { ड्रम, ढोल, झांज { खंजिरी, ट्रँगल { मर्किसर (खुळखुळे) { ओबो, सुप्रानो { हायपाफोन तियाफोन { सूरजमुखी, आॅरगन.

बॅण्ड पथकही शाहीच हवे...
^नाशिकला आमच्याकडे जे काही बॅण्ड पथक आलेत, त्यांनी पैसे फार मागितले. आम्हाला २१, ५१, १०१ अशा संख्येत पथकातील सदस्य लागतात. त्यांची पद्धती आम्ही बघतो, त्यांच्याकडे वाद्यांची गाडी असावीच लागते, गायकही उत्तम असावेत, अशी आमची अपेक्षा असते. शाही मिरवणुकीत बॅण्डही शाहीच असावा. महंतराजेंद्रदास महाराज, प्रमुख, निर्मोही अनी आखाडा

काहीतरी व्यवस्था करावीच लागेल
^पर्वणीच्यादविशीच्या मिरवणुकीला बॅण्ड पथकाची वाद्यही पारंपरिक असतात. पण, नाशिकमध्ये आम्ही अनेक बॅण्ड पथकांशी संपर्क साधला, पण अद्यापही आम्हाला पाहजिे तसा बॅण्ड मिळालेला नाही. जर नाशिकमधून आम्हाला हवे तसे वादक मिळाले नाहीत तर आम्ही आमच्या गावाहून पथक बोलावू. महंतवैष्णवदासजी महाराज, महामंत्री, दिगंबर अनी आखाडा

हवे मोठे पथक
नाशिकमध्येअसलेल्या बॅण्डमध्ये ८-१० वादक असतात. मात्र, साधूंची मागणी ही २१, ५१ वा १०१ वादकांची असते. एवढा मोठा बॅण्ड नाशिकमध्ये मिळणे अशक्य आहे. मुळातच छोट्या बॅण्ड पथकांचे मानधनच ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत सांगितले जाते, तर मग मोठ्या बॅण्ड पथकांचे मानधन किती होईल, ते कसे द्यायचे, असा प्रश्न या साधू-महंतांना पडला आहे.

शिस्त दिसावी
महंतांचेबॅण्ड पथकाच्या ड्रेपरीवरही लक्ष आहे. दुर्दैवाने आता त्यांना पूर्वीसारखे लाल, पविळ्या, निळ्या, चमकी लावलेल्या विविध आकारांच्या टोप्या असलेले बॅण्ड बघायलाच मिळत नाहीत. तसेच, त्यांची आणखी एक मागणी ही आहे की, पोलिस बॅण्डची जशी शिस्त असते तशीच शिस्त या आमच्या मिरवणुकीतील बॅण्डला असावी.
महंतांना नापसंत
एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल पाच कुंभमेळ्यांत आखाड्यांच्या शाही मिरवणुकीत बॅण्ड वाजविण्याचा मान मला मिळाला. पण, कालांतराने काही बॅण्डमालकांच्या आडमुठ्या विचारांनी बँजो पार्टीमुळे नाशिकची शान असलेली बॅण्डची परंपरा लोप पावली, अशी खंत ज्येष्ठ रंगकर्मी, वादक, मूर्तिकार नेताजीदादा भोईर यांनी व्यक्त केली. आखाड्यांना मिरवणुकीसाठी बॅण्ड मिळेना, या पार्श्वभूमीवर दादांशी बॅण्डविषयी साधलेला हा संवाद...
यामुळे बंद झाले बॅण्ड...
एकतर बँजो पार्ट्या आल्या हे मुख्य कारण आहेच. पण, काही बॅण्डमालकांनी फार लवकर खेड्यापाड्यातील लोकांना बॅण्डसाठी नाशिकमध्ये आणलं. या लोकांना तिकडे कामं नसायची. इकडे कमी पैशात वाजवण्याचं काम मिळालं. त्यामुळे मूळ नाशिकपासून ही कला तुटली. दुसरं म्हणजे व्यायामशाळेच्या पथकांमधून नंतर व्यावसायिकता वाढल्यामुळे तेही बंद झाले. पुढे व्यावसायिकांकडील वादकांमध्ये व्यसनाधीनता वाढली. बॅण्डमधील शिस्त, सुरेलपणा, सराव गेला. अनेक वादकांना तर व्यसनं केल्याशविाय वाजवताच येत नसे. अनेक जण उचल घेऊन पळून जात असत. त्यामुळे हळूहळू आपली परंपरा लयाला गेली, त्याचं फार वाईट वाटतं.