आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये साकारणार सायन्स एज्युकेशनल हब, कल्पना यूथ फाउंडेशनचा अनोखा उपक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी, तसेच िनरनिराळ्या वैज्ञानिक प्रतोगांबद्दल त्यांना माहिती व्हावी, या उद्देशाने कल्पना यूथ फाउंडेशनतर्फे शहरात सायन्स आणि एज्युकेशनल हब सुरू करण्यात येणार आहे. या हबमध्ये विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या शिक्षणाबद्दल सखोल माहिती देण्यात येऊन टू डी आणि थ्री डी प्रोजेक्टर्सद्वारे प्रयोग करण्याची संधीही मिळू शकणार आहे.
नाशिक शहराला देशभरात वाइन कॅपिटल अशी नवी ओळख मिळाली आहे. धर्मक्षेत्र म्हणून नाशिक पुरातन काळापासून ओळखले जाते. आता नाशिक शहराची ओळख सायन्स किंवा एज्युकेशनल हब म्हणून व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यासाठी वैज्ञानिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. हैदराबादच्या बिर्ला सायन्स सेंटरप्रमाणे नाशिकमध्येही सायन्स सेंटर निर्माण व्हावे म्हणून या संस्था प्रयत्नशील आहेत. येत्या एक ते दीड महिन्यात ही संस्था आकाराला आणण्याचा प्रयत्न आहे. यासाठी शहरात जागेचा शोध सुरू आहे. यासाठी दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग आयईटीई या संस्थांचाही यात सहभाग राहाणार आहे. विज्ञान अंतराळ विज्ञान शिक्षणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भर दिला आहे. त्यास हा प्रकल्प पूरक ठरणार असल्याचे कल्पना यूथ फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले आहे. याहबमध्ये पुढीलप्रमाणे सुविधा असतील :

अॅडव्हान्सप्रयोगशाळा : यातशून्य गुरुत्वाकर्षावर गेल्यानंतरचे काय आणि कसे अनुभव येतात, आणि त्या ठिकाणी गेल्यावर काय करावे, याचे संपूर्ण नॉलेज यामध्ये देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वैमानिकाला देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाबाबत माहिती देण्यात येईल.

सोलरसिस्टिम : सोलरसिस्टिम या प्रकारामध्ये विद्यार्थ्यांना आकाशगंगेच्या संबंधित सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करता येणार आहे. तसेच, संपूर्ण ब्रह्मांडाचा अभ्यास या ठिकाणी विद्यार्थ्यांना करता येणार आहे. यालाच कॉसमोलॉजी असे म्हणतात.

अॅडव्हान्सटेलिस्कोप : मुख्यम्हणजे यामध्ये सोलर सिस्टिमचा अभ्यास या टेलिस्कोपतर्फे करण्यात येणार आहे. आकाशगंगेवर रिसर्च होण्यासाठी तसेच निरनिराळ्या प्रकारचे ग्रहण आपण याद्वारे बघू शकणार आहोत.
कार्यशाळांचे आतोजन स्पर्धा
सायन्स हबमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यशाळांमध्ये विविध स्पर्धांचे आतोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्पेस सायन्स संबंधित वर्कशॉप होतील. विविध स्पर्धांमध्ये लाइव्ह प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, स्टँटिक अँड डायनॅमिक मॉडेल, स्पेस सेटलमेंट कॉम्पिटिशन अशा स्पर्धांचा समावेश राहील.

विद्यार्थ्यांचा फायदा
-शहरातप्रथमच अनेक संस्था मिळून विद्यार्थ्यांसाठी सायन्स हबची निर्मिती करण्यात येत आहे. या हबचा विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात नक्कीच उपयोग होणार आहे. या थीमद्वारे विद्यार्थ्यांना अधिक प्रयोग पाहायला मिळतील. त्यांच्यात विज्ञानाबद्दल नक्कीच रुची निर्माण होईल, असा विश्वास आमच्या टीमला आहे. अपूर्वाजाखडी, युनोस्पेस अ ॅम्बेसेडर, नासा स्पेस एज्युकेटर

* अॅडव्हान्स प्रयोगश‌ाळा
* शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांना यात प्राधान्य.
* सोलर सिस्टिम एज्युकेशन
* टू डी आणि थ्री डी प्रोजेक्टर्सद्वारे प्रयोगाची सुिवधा
* अॅडव्हान्स टेलिस्कोप
* विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार
* सायन्स आर्ट गॅलरी