आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुसुमाग्रजांच्या अाशीर्वादाच्या बळानेच घडले शिक्षणसेवेचे कार्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशकात दाखल हाेऊन जून १९५८ ला मी प्राचार्यपदाचा कार्यभार स्वीकारला. त्याच दिवशी कुसुमाग्रज अर्थात तात्यासाहेब शिरवाडकर, खासदार गाेविंदराव देशपांडे अाणि दादासाहेब पाेतनीस हे २२ वर्षांचा प्राचार्य कसा असताे, हे पहायला अाणि मला अाशीर्वाद द्यायला अाले. साक्षात कुसुमाग्रज अाले असल्याचे कळताच मी केबिनबाहेर जाऊन त्यांना नमस्कार केला. त्यावेळी त्यांनी ‘प्राचार्यांचे प्राचार्य व्हा, सारस्वतांचे सारस्वत व्हा अाणि असेच कार्यरत रहा’ हा दिलेला अाशीर्वादच मला अायुष्यभराच्या अविरत कार्याचे बळ देऊन गेल्याचे गाेएसाेचे सचिव डाॅ. माे. स. गाेसावी सरांनी सांगितले. 
 
राेटरी क्लब अाॅफ नाशिकच्या वतीने कुर्तकाेटी सभागृहात शनिवारी अायाेजित नाशिक भूषण पुरस्कार साेहळ्याप्रसंगी पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बाेलत हाेते. श्रुतीसागर अाश्रमाचे स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते अाणि मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. इ. वायुनंदन यांच्या उपस्थितीत हा साेहळा पार पाडला. यावेळी बाेलताना डाॅ. गाेसावी यांनी मी सदैव ‘विद्यार्थी देवाे भव असे मानून कार्य करीत गेलाे अाणि इतके माेठे काम हातून घडल्याचेही नमूद केले. मी कॅम्पसमध्ये अालाे, त्यावेळी संस्थेत २५० विद्यार्थी शिक्षण घेत हाेते. ती संख्या अाता केवळ कॅम्पसमध्ये २५ हजार तर शिक्षण संस्थेमध्ये सव्वा लाख विद्यार्थी शिक्षण घेण्यापर्यंत मजल मारली असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

शिक्षणाची त्रिसूत्री : शिक्षणहे गुणवत्तापूर्ण हाेतानाच ते परवडणारे अाणि प्रत्येकाला उपलब्ध असणे अावश्यक असल्याचेही गाेसावी सरांनी नमूद केले. शिक्षणातील सर्वात महत्त्वाचा घटक हा शिक्षक असल्याने ते अत्याधुनिक ज्ञानाने परिपूर्ण असणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षण देताना किंवा घेताना अभिनवतेची कास धरा, एकत्रित येऊन प्रयास करा, शिक्षणाच्या क्षेत्रात वादविवाद मिटवा अाणि अापला ठसा उमटेल असे कार्य करण्याचा प्रयास केल्यास सर्व शिक्षणव्यवस्था सुरळीतपणे कार्यरत राहू शकतील, असेही ते म्हणाले. सुनंदाताई गाेसावी यांचादेखील सत्कार करण्यात अाला. यावेळी कुलगुरू डाॅ. वायुनंदन यांनी या साेहळ्याला उपस्थित राहणे हेच माझे भाग्य असल्याचे मानताे, असे सांगितले. तर स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी डाॅ. गाेसावी सर यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. तसेच माझ्यासारख्या तपस्वीला एका ज्ञानतपस्वी व्यक्तिमत्त्वाचा गाैरव करण्याची संधी मिळाल्याबद्दल ऋणी असल्याचेही नमूद केले. नाशिक भूषण पुरस्कार समितीचे डाॅ. भाऊसाहेब माेरे यांनीही मनाेगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राेटरी क्लब अाॅफ नाशिकचे अध्यक्ष अनिल सुकेणकर यांनी, तर प्रमुख पाहुण्यांची अाेळख सुरेखा राजपूत यांनी करून दिली. मानपत्राचे वाचन मनीष चिंधडे यांनी केले. अध्यक्षांची अाेळख धनलक्ष्मी पटवर्धन यांनी करून दिली. राधेय येवले यांनी अाभार मानले. 

 
बातम्या आणखी आहेत...