आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वज ‘फडके’ सावजींचा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदाची निवडणूक कधी नव्हे ती इतकी उत्सुकतेची आणि चर्चेची ठरली ती केवळ विद्यमान शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांना पक्षांतर्गत होणारा प्रचंड विरोध आणि दोघा-तिघांकडून उघडपणे शहराध्यक्षपदासाठी केली गेलेली दावेदारी. मात्र, शेवटच्या क्षणी अचानक सावजी यांच्या नावावर झालेले शिक्कामोर्तब याप्रकाराने इच्छुकांसह निवडणूक प्रक्रियेतील सगळ्यांनाच धक्काच देणारी ठरली. या चार तासांच्या प्रक्रियेत पक्षर्शेष्ठींपेक्षाही स्थानिक पातळीवरून रिपोर्टिंग करणार्‍या ‘डॉक्टरांचे’च पारडे जड भरल्याने सावजी यांची वर्णी लागल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेच्या निवडणुकांमध्ये सुरुवातीपासूनच शिवसेनेसोबत न लढता स्वबळावर लढण्याचा मोर्चा उघडणार्‍या सावजी यांना पक्षाच्या आजी-माजी पदाधिकार्‍यांनी नापसंती दर्शविली होती. सलग 20 वर्षांपासून मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेशी युती तोडून भाजपने स्वबळावर निवडणूक लढविली. यामध्ये गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही चौदाचा आकडा कायम राहिला असला तरी सत्तेत येण्यासाठी थेट मनसेशी केलेली युती संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली. यामागे देखील सावजी यांची रोखठोक भूमिकाच कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते. परंतु, या प्रक्रियेत विरोधीपक्षातील बड्या नेत्यांशी मधुर संबंधांचीही उघड चर्चा होऊन तसे त्यांच्यावर आरोपही झाले.

कुठलेही आंदोलन अथवा पक्षाच्या संघटनात्मक बांधणीस प्राधान्य न देता चौकटीतील मंडळीसोबतच वावरण्याचा त्यांच्यावर आरोप झाला. अनेक र्मजीतील मंडळींनाच उमेदवारी मिळवून पक्षाचे नुकसान केल्याचीही त्यांच्यावर टीका झाली होती. यामुळेच या शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. त्यातच आगामी निवडणुका लक्षात घेता आक्रमक चेहरा देण्याची मागणी होत होती. यात, सर्वात पुढे युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. सुहास फरांदे व विजय साने यांची नावे घेतली जात होती. हे दोघेही पक्षर्शेष्ठी म्हणजे विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे, प्रदेशअध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्कात होते. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशीही चर्चा केल्याचे दर्शविले गेले. अखेरीस सावजींच्याच गळ्यात माळ पडली.