आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेशल मीडियाच्या जाळ्यात चाैथ्यांदा भाजप, अाॅडिअाेमुळे अामदार सीमा हिरे अडचणीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अामदार सीमा हिरे - Divya Marathi
अामदार सीमा हिरे
नाशिक - महापालिका निवडणुकीत कधी तिकीट वाटताना पैसे घेण्याचे तर दहा-दहा लाख रुपये देऊन तिकीट मिळाल्याबाबत दावा करणारी व्हिडिअाे व्हायरल झाल्यामुळे बदनामाची सामना करणाऱ्या भाजपमागचे शुक्लकाष्ठ काही थांबले नसून अाता निवडणुकीनंतर पक्षातील काेणत्या उमेदवारांना पाडायचे स्वत:च्या घरातील उमेदवारासाठी कसा एकटा प्रचार करायचा याबाबत फाेनवरील कथित संभाषणामुळे भाजप अामदार सीमा हिरे चर्चेत अाल्या अाहेत. अर्थात या अाॅडिअाे क्लिपमधील अावाज हिरे यांच्याशी मिळताजुळता असला तरी, त्याची अधिकृतता स्पष्ट झालेली नाही. 
 
यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले. विशेष म्हणजे, लाेकसभा विधानसभेप्रमाणे भाजपची लाट नसतानाही त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे पक्षात अामदारांमधील बेबनाव, वाढती गटबाजी असूनही भाजपने उल्लेखनीय कामगिरी केली अाहे. त्यामुळे या श्रेयाचे खरे हक्कदार काेण याचाच शाेध लागलेला नाही. अशात पक्षाचे पाय खेचून स्वत:ची ताकद सिद्ध करण्यासाठी अामदारांकडून झालेले प्रयत्न उघड झाल्यामुळे पक्षाची पुन्हा एकदा साेशल मीडियावर बदनामी सुरू झाली अाहे. अाताचा हा अंक नाशिक पश्चिम मतदारसंघातील असून अामदार सीमा हिरे ह्या या अाराेपाच्या केंद्रस्थानी अाहे. मतदानापुर्वी फाेनद्वारे निकटवर्तीय कार्यकर्त्यांना त्यांनी प्रभाग क्रमांक मध्ये काेणाला चाल द्यायची काेणाला या व्हिडिअाेमुळे यापूर्वीच बदनाम उमेदवारांकडून लाख रुपये पक्षनिधी म्हणून घेत असल्याचा भाजप कार्यालयातील नाना शिलेदार यांचा व्हिडिअाे सर्वप्रथम व्हायरल झाला हाेता. त्यानंतर अामदार देवयानी फरांदे गाेपाळ पाटील यांच्या उपस्थितीत काही नाराज कार्यकर्ते १० लाख रुपये देऊनही उमेदवारी मिळत नसल्याबाबत कैफियत मांडताना दिसत हाेते. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्याचा पुत्र असलेल्या एका उमेदवाराच्या वैयक्तिक अायुष्याला प्रभावित करणारा एक व्हिडिअाे व्हायरल झाला. अाता हा चाैथा धक्का साेशल मीडियातून भाजपला बसल्याचे दिसत अाहे. 

पाडायचे याबाबत मार्गदर्शन करत असल्याचे अाॅडिअाेतील अावाजावरून दिसत अाहे. या अाॅडिअाेत प्रभाग मध्ये भाजपच्या विजयी उमेदवार मनीषा भामरे यांना प्रथम चाल देऊ नये असे सांगितले गेले तर त्यानंतर प्रभाग मध्ये दिनकर पाटील यांचे चिरंजीव अमाेल पाटील यांना मत देऊ नका अापल्या संबंधित लाेकांनाही सांगा, असा संदेश दिल्याचे दिसत अाहे. 

सानपांचा इशारा काेणाकडे? : शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी पक्षाला बहुमत मिळाले असले तरी, अनेक जागा अंतर्गत हितशत्रूंमुळे पडल्याचा गाैप्यस्फाेट केला हाेता. त्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवणार असल्याचे सांगितले हाेते. पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही सानप यांचा शब्द उचलून धरीत ८० पेक्षा अधिक जागा येऊ शकल्या असत्या, मात्र पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या गद्दारीमुळे अपेक्षित यश मिळू शकले नसल्याचे स्पष्ट केले हाेते. या पार्श्वभूमीवर हिरे यांचा कथित व्हिडिअाे अामदारांमधील वाढता बेबनाबावर प्रकाश टाकत असल्याचे बाेलले जाते. 
 
पुढच्य स्लाईडवर वाचा, पाटील यांच्या नैराश्यातून बनावट अाॅडिअाे... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...