आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंडली बघण्यास गेलेल्या कुटुंबीयांचा अपघात; उपवधूसह अाई, मावशीचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातात वाहन - Divya Marathi
अपघातात वाहन
नाशिक - भरधाव कारने दुसऱ्या कारला दिलेल्या धडकेत उपवधू, तिची आई आणि मावशी  ठार झाली. शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता नाशिक शहरातील गडकरी चौकात ही दुर्दैवी घटना  घडली. मृत तिघीही जळगावच्या अाहेत. सिन्नर येथील ब्राह्मणवाडे येथे मुलीची लग्नकुंडली पाहण्यासाठी जात असताना त्यांच्या कारला हा अपघात झाला.  
 
जळगाव येथील लीलाधर भामरे व कुटुंबीय स्विफ्ट कारने (एमएच १५ डीसी ०५२७) सातपूर येथे गेले  होते. शुक्रवारी पहाटे नाशिक शहरातील गडकरी चौकात आले असता सीबीएसच्या बाजूने येणाऱ्या भरधाव स्काेडा कारने भामरे यांच्या कारला जाेराची धडक दिली. या अपघातात स्विफ्ट कारच्या मागील सीटवर बसलेल्या योगिनी लीलाधर भामरे (२०), सरिता भामरे (३६) आणि योगिनीची मावशी  रेखा प्रकाश  पाटील या गंभीर जखमी झाल्या.

अपघाताच्या आवाजाने परिसरातील नागरिक जागे झाले. काहींनी जखमींना तत्काळ  जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, याेगिनीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी जाहीर केले, तर इतर दाेघींचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात पुढील सीटवर बसलेले लीलाधर भामरे व चालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपघातग्रस्त कारचे नुकसान
भामरे कुटुंबीय जळगाव येथून आपले सातपूर येथील नातेवाईक पाटील यांच्याकडे गेले. सरिता पाटील यांना गाडीमध्ये घेत पुढे सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे मुलीची लग्नाची कुंडली  बघण्यास जाणार होते. मात्र, काळाने भामरे आणि पाटील  कुटुंबीयांतील महिलांसह उपवधू  योगिनीला हिरावून नेले. या अपघातात स्विफ्ट कार चक्काचूर झाली. चालकाचे आणि शेजारील सीट वगळता पाठीमागील सर्व सीट तुटून दूर पडले. केवळ पुढील भाग शिल्लक राहिला.
बातम्या आणखी आहेत...