आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: बाेटॅनिकल गार्डनचा ‘लेसर शाे’ नागरिकांमध्ये लोकप्रिय, पण प्रशासनाचा भोंगळ कारभार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मनसे प्रमुखराज ठाकरे यांच्या प्रयत्नाने टाटा कन्सल्टन्सीने आपल्या सीएसअार निधीतून नाशिक शहरामध्ये बाेटॅनिकल गार्डन विकसित केले अाहे. पूर्वी असलेल्या पंडित नेहरू वनाेद्यानाचेच रूपांतर बाेटॅनिकल गार्डनमध्ये करण्यात अाले अाहे. यात सायंकाळी दाखविण्यात येणारा ‘लेसर शाे’ हा सर्वांसाठीच अाकर्षणाचा विषय ठरला अाहे.
 
हा ‘लेसर शाे’ बघण्यासाठी दरराेज माेठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. परंतु ही गर्दी टिकवून ठेवण्याची जबाबदारी केवळ टाटा कन्सल्टन्सीचीच अाहे अशाच अर्विभावात वनविभागाची येथील कार्यपद्धती दिसत आहे. 
 
शहरापासून १० किलोमीटर अंतरावर हे गार्डन असल्याने चारचाकी अाणि दुचाकी वाहनांद्वारे पर्यटक या ठिकाणापर्यंत पाेहाेचतात. परंतु, येथे काेणत्याही प्रकारच्या वाहनतळाची व्यवस्था नसल्याने येणारी वाहने चक्क सर्व्हिसराेडच्या कडेलाच उभी केली जातात. शाे सुरू हाेण्यापूर्वी अाणि शाे सुटल्यानंतर ही वाहने एकाच वेळी बाहेर पडत असल्याने या ठिकाणी आलेल्या पर्यटकांनाच वाहतूक कोंडीच्या समस्येला सामाेरे जावे लागते. 

टाटा कन्सल्टन्सीने १४ काेटी रुपये खर्च करून हे उद्यान उभारून दिले असताना वनविभागाने येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी किमानपक्षी वाहनतळाची व्यवस्था तरी करणे क्रमप्राप्त अाहे. परंतु, केवळ पार्कमध्ये येणाऱ्यांची तिकिटे काढणे याशिवाय वनविभाग काेणतीही जबाबदारी पार पाडताना दिसत नाही. वाहनतळासाठी वाजवी शुल्क अाकारले तरीही ते देण्यास पर्यटक तयार अाहेत. त्यामुळे संबंधित विभागाने त्यादृष्टीने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
 
 बाहेरच्या व्यवस्थेचे काय? 
टीसीएल कंपनीने नियुक्त केलेल्या ११ खासगी सुरक्षारक्षकांकडे गार्डनची व्यवस्था अाहे. वनविभागाचे वनमजूर अाणि वनरक्षक अाहेत. तेही वनाैषधी उद्यानाच्या व्यवस्थेत व्यस्त असतात. अशा परिस्थितीत गार्डनबाहेर पर्यटकांच्या हाेणाऱ्या गैरसाेयीकडे लक्ष द्यायला काेणाला वेळच नसताे, अशी परिस्थिती अाहे. 
 
महामार्गावरील रांगेमुळेही अपघाताचा धाेका 
गार्डनमध्ये जाण्यासाठी पर्यटकांची भली माेठी रांग प्रवेशद्वाराबाहेर दिसते. लेसर शाेच्या जागेवर पर्यटकांनी अाधीच जाऊ नये, म्हणून अात प्रवेश दिला जात नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते. परंतु ही रांग थेट महामार्गावर जात असल्याने अपघातही हाेण्याची शक्यता अाहे. अशा परिस्थितीत वनविभाग पर्यटकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेईल का, असा प्रश्न आता उपस्थित हाेत अाहे. 
 
खेळण्यांचीही माेडताेड 
बाेटॅनिकल गार्डन बघण्यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ५. ३० वाजेच्या सुमारास ३० रुपये शुल्क अाकारले जाते. हे गार्डन सुरू हाेऊन दाेन महिनेदेखील उलटलेले नाही. मात्र, खेळण्यांमध्ये ठेवलेली वेगळ्या पद्धतीची सायकल अाणि चक्रीची अाताच माेडताेड झाली अाहे. याकडे वनविभागाचे वा संबंधित ठेकेदारांचेही लक्ष नाही. 
 
साप्ताहिक सुटी कशासाठी? 
बाेटॅनिकल गार्डनचा विकास सीएसअार निधीतून झाला असला तरीही ते ‘सरकारी’ पद्धतीनेच चालविले जात असल्याचे दिसते आहे. या उद्यानातील ‘लेसर शाे’ला बुधवारी सुटी देण्यात अाली अाहे. याची माहिती पर्यटकांना नसल्याने बुधवारच्या दिवशी अनेक पर्यटक निराश हाेऊन परततात. उद्यानाला मोठा प्रतिसाद लाभत असतानादेखील साप्ताहिक सुटी देण्याची गरज काय? ठेकेदाराच्या माध्यमातून उद्यानाची व्यवस्था हाेत असताना सुटी नेमकी कशासाठी दिली जाते, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित हाेत अाहेत. 

एक गार्डन अन् चार विभाग 
बाेटॅनिकल गार्डनची जबाबदारी काेणत्याही एका विभागाकडे नसल्याने निर्णयप्रक्रियेत माेठ्या अडचणी येत असल्याचे कर्मचारी सांगतात. वनाैषधी उद्यान वनविभागाच्या अखत्यारीत अाहे. त्यात ‘टीसीएस’ने सीएसअार निधीतून गार्डन उभारले. त्यानंतर या गार्डनची जबाबदारी वनविकास महामंडळाकडे अाली. मात्र, गार्डनच्या प्रवेशद्वाराबाहेर काही व्यवस्था करायची असल्यास महापालिकेची मान्यता घ्यावी लागते. त्यामुळे कुठलाही निर्णय तातडीने घेतला जात नाही. 

प्रवेशद्वाराबाहेरच मोठी असुरक्षितता 
बाेटॅनिकल गार्डनमधील लेसर शाे हा विशेषत: बालकांसाठी महत्त्वपूर्ण अाहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा शाे बालकांसाठी माेठी पर्वणीच ठरताे. त्यामुळे स्वाभाविकच येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये बालकांची संख्या लक्षणीय अाहे.
 
परंतु, त्यांच्या सुरक्षिततेसाठी कुठलीही उपाययाेजना गार्डनमध्ये वा गार्डनच्या बाहेर केलेली दिसत नाही. कुटुंबातील सदस्यांपैकी एक सदस्य जेव्हा तिकिटाच्या रांगेत उभा असताे तेव्हा अन्य सदस्यांना उभे रहायला वा बसायला पुरेशी जागाही नसते. चुकून एखादे बालक खेळत महामार्गावर गेल्यास अपघातही संभवताे. अशीच अवस्था लेसर शाे सुटल्यानंतर गार्डनच्या बाहेर असते. 
पुढील स्लाईडवर वाचा सविस्तर बातमी.... 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...