आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Boy Murtaza Trunkawala Selected In Ranji Team

नाशिकच्या मुर्तझा ट्रंकवालाची राज्य रणजी संघात निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकचा उगवता स्टार फलंदाज मुर्तझा ट्रंकवाला याची महाराष्ट्राच्या २३ वर्षांखालील रणजी संघात निवड करण्यात आली. शनिवारी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात अाला. मुर्तझा हा मधल्या फळीतील भरवशाचा उजव्या हाताचा फलंदाज म्हणून अनेक वर्षांपासून विविध स्तरावरील क्रिकेट सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे. त्याने महाराष्ट्राच्या १६ वर्षांखालील, १९ वर्षांखालील आणि २३ वर्षांखालील संघातून खेळतानाही चमकदार कामगिरी बजावली आहे. महाराष्ट्राच्या संघात निवड झालेला १९ वर्षीय मुर्तझा हा नाशिकचा हा सर्वाधिक लहान खेळाडू आहे.