आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसएनएल कर्मचार्‍यांचा आजपासूनचा संप मागे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- बीएसएनएलचे अधिकारी व कर्मचार्‍यांना देय असलेला 78.2 टक्के महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे संघटनांच्या संयुक्त कृती समितीने जाहीर केलेला बुधवारपासूनचा बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे.

सन 2007 पासूनचा वाढीव महागाई भत्ता देण्यात चालढकल होत असल्याची संघटनांची तक्रार होती. समितीतर्फे गेल्या आठवड्यात लाक्षणिक आंदोलनही करण्यात आले होते. मागील वर्षीच्या आंदोलनावेळीसुद्धा प्रशासनाने महागाई भत्ता देण्याबाबतचा निर्णय घेतला होता. मात्र, अंमलबजावणीत चालढकल आणि वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले जात असल्याचा आक्षेप घेत राष्टÑीय स्तरावर संयुक्त कृती समिती स्थापन करून आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता.

संघटनेत आनंद
संघटनेची मागणी मंजूर होऊन महागाई भत्ता मिळणार असल्याने बेमुदत संप मागे घेतला आहे.
-घनश्याम वाघ, जिल्हा सचिव, युनियन

फरक नाही
10 जूनपासून 78.2 टक्के महागाई भत्ता मिळणार असला तरी 2007 पासूनचा फरक मात्र मिळणार नाही.