आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Bsnl Opposite Strick Employee Associoation

नाशिकमध्ये ‘बीएसएनएल’समोर धरणे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक: संचार निगम एक्झिक्युटिव्ह असोसिएशन आणि अखिल भारतीय भारत संचार निगम असोसिएशन या संघटनांच्या वतीने त्र्यंबकरोडवरील बीएसएनएल मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
संघटना पदाधिकार्‍यांनी सांगितले की, बीएसएनएलचा पर्याय नाकारणार्‍या आयटीएस अधिकार्‍यांना मूळ सेवेत परत पाठविण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, बीएसएनएलच्या नियंत्रणाखालील आयटीएस अधिकार्‍यांनी नियमांत सुधारणा करीत स्वत:ला बीएसएनएलमध्येच कसे समाविष्ट करता येईल, यासाठी प्रयत्न चालवले आहेत. बीएसएनएलकडे 35 हजारांवर उच्चशिक्षित तांत्रिक अधिकारी आहेत. त्यांना कामकाजाचा चांगला अनुभव असल्यामुळे बीएसएनएलच्या कामकाजात जास्त प्रगती होऊ शकते. मात्र, उलटा न्याय लावून त्यांना डावलण्यासाठी हेतुपुरस्सर प्रयत्न केले जात आहेत. याविरोधात एकजूट दाखवण्यासाठीच संघटनेने धरणे आंदोलन केले.
पत्रकात म्हटले आहे की, स्टार एक्झिक्युटिव 1 आणि 2 यांच्या वेतनर्शेणीची अंमलबजावणी झालेली नाही. भरती प्रक्रिया राबवण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली असून, वरिष्ठ उपप्रबंधक व संयुक्त महाप्रबंधक दर्जापासून महाप्रबंधक या पदासाठी गैरवाजवी भरतीचे नियम तयार केले आहेत. यामुळे अधिकार्‍यांचे भवितव्यच धोक्यात येण्याची भीती आहे.
राज्य अध्यक्ष धर भड, जिल्हा सचिव एम. बी. सांगळे, जिल्हाध्यक्ष र्शीकांत भदाणे, एआयबीएसएनएल संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी. डी. गायकर, अध्यक्ष घरडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.