आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या बुलेटस्वारांची लेह-लडाखवर स्वारी, सात बुलेटस्वारांनी लेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वर्षभरापासून सुरू असलेल्या तयारीच्या जाेरावर नाशिकच्या क्रुझिंग गाॅड्स ग्रुपमधील सात बुलेटस्वारांनी लेह, खारदुंगला पासपर्यंत धडक मारून अनाेख्या जिद्दीचे दर्शन घडवले. सुमारे वीस दिवसांच्या या प्रवासात त्यांनी हाडे गाेठवून टाकणाऱ्या थंडीसह कडक उन्हाच्या झळापर्यंतच्या टाेकाच्या विराेधी वातावरणाचाही सामना केला.
या साहसी प्रवासासाठी क्रुझिंग गाॅडस ग्रुपतर्फे वर्षभर अाधीपासून नियाेजन झाले हाेते. लेह-लडाख येथील रस्ता हा बाॅर्डरराेड अाॅर्गनायजेशनच्या मार्गदर्शनाखाली केवळ एप्रिल ते सप्टेंबर असा सहा महिनेच खुला असताे. त्यामुळे त्याच काळात जाणे अावश्यक असल्याने जूनच्या पूर्वार्धातच ही भरारी घ्यायची असे ठरवून त्याप्रमाणे सर्व नियाेजन करण्यात अाले.

सात जणांची टीम
ग्रुपचे अध्यक्ष मकरंद उदावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश लांडे, तुषार घावटे, महेंद्र सूर्यवंशी, सागर चांदवडकर, अमाेल करंजकर, सनी अामले यांनी ही साहसी राइड केली. अंबाला, बिलासपूर, मनाली, जिस्पा, सार्चू, लेह, खारदुंगला पास, नुबरा व्हॅली, पॅनगांॅग लेक, लेह, श्रीनगर, जम्मू, चित्ताेडगड, रतलाम, इंदाेर, धुळेमार्गे ते परतले. एकूण ४३५० किमीचे अंतर बुलेटवरून पार करीत वीस दिवसांनी ते पुन्हा नाशकात दाखल झाले.

अनुभवली निसर्गाची विविध रूपे : याप्रवासात सर्वच रायडर्सनी निसर्गाच्या विविध रूपांचा अनुभव घेतला. उत्तरेकडील कडाक्याच्या थंडीपासून पश्चिम भारतातील गरम वाफांमधून केलेला प्रवास सर्वांसाठीच अनाेखा अनुभव ठरला. अाठवडाभरात देशाच्या विविध भागांतील हवामानातील भिन्नता अाणि त्यातून अाराेग्य चांगले राखून केलेला प्रवास हा अायुष्यभराची शिदाेरी ठरल्याचे तुषार घावटे, गणेश लांडे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...