आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Burns Hospital,latest News In Divya Marathi

‘ती’ ला मिळाली स्नेहालयच्या मायेची ऊब, सातपूर स्‍फोटातील वाचलेल्या ‘संतन’ ला नवजीवन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- साक्षातमृत्यूनेही जिच्या जिद्दीपुढे हार मानली त्या संतनला स्नेहालयच्या मायेची ऊब मिळाली आहे. नाशिक बर्न्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन पूर्णपणे बरी झालेल्या या जिमुकलीचा आई-वडिलांच्या रूपाने असलेला आधार नियतीने हिरावून घेतल्यानंतर स्नेहालयाकडून तिला आता ही माया आहे.
सातपूर-अंबड लिंकरोडवरील बजरंगनगर येथे राहणाऱ्या अरविंद सिंग यांच्या कुटुंबावर २७ मे ला काळाने घाला घातला. गॅस सिलिंडरच्या अनाहूत झालेल्या स्‍फोटात सात वर्षाच्या संतनसह तिचा पाच वर्षांचा भाऊ, आईही भाजली. त्यांना एका खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती केले गेले. तेथेच भाऊ मधुसूदन याचा मृत्यू झाला. यानंतर काही जणांनी अरविंदसिंग त्यांच्या पत्नी आणि संतनला नाशिक बर्न्स सेंटरमध्ये दाखल केले. दरम्यान ‘दिव्य मराठी’ने या मजुरी करून जीवन कंठणाऱ्या कुटुंबाकरिता मदतीकरिता नाशिककरांना आवाहन केले. मात्र याच दरम्यान अरविंदसिंग आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. यानंतर ‘दिव्य मराठी’तील मदतीकरिता आवाहन पाहून अनेक दानशूरांचे हात एका बाजूला पुढे आले, तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्येही शहरातील नामांकित डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत, या चिमुकलीचा जीव वाचविला, साठ टक्के भाजलेल्या संतनची जगण्याची प्रबळ इच्छा आणि मृत्युला हरविण्याची जिद्द डॉक्टरांनी पाहिली. ती पूर्णपणे बरी झाली.
स्नेहालयाकडून मिळाली मायेची ऊब
दरम्यानमागे कुणीच नसलेल्या संतनपुढे नवे आव्हान निर्माण झाले, हॉस्पिटलचे सगळे कर्मचारी, डॉक्टर्सची कुटुंबे जरी तीला घरच्याप्रमाणे प्रेम करीत असली, तरी हॉस्पिटल ही तिच्या कायम राहण्याची जागा नव्हती. दरम्यान स्नेहालयचे संस्थापक डॉ.गिरीश जोशी यांच्यासह त्यांच्या टीमने हॉस्पिटलला भेट देऊन डॉक्टर्स आणि संतनशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्यांनंतर महिनाभरात म्हणजे आठ दिवसांपूर्वीच संतनला स्नेहालयाच्या कुटुंबात सामावून घेण्यात आले. ती आता स्नेहालयात पुरती रमली असल्याचे नाशिक बर्न्स सेंटरचे डॉ.राहुल शिदे यांनी सांतले.