आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्याेजकांच्या बैठकीत पाेलिस उपायुक्तांचे खडे बाेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अाठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या सुटीतील बंदाेबस्ताच्या नियाेजनाकरिता उद्याेजक संघटना अाणि पाेलिस यांची संयुक्त बैठक शुक्रवारी अायमा रिक्रिएशन सेंटर येथे बाेलविण्यात अाली हाेती. या बैठकीची चार वाजेची वेळ टळून गेली तरी उद्याेजकांची उपस्थिती अल्पशी हाेती. त्यामुळे या बैठकीस अर्धा तास अाधी उपस्थित असलेले पाेलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी पाेलिस अायुक्त रवींद्र सिंघल यांना बैठकीला येऊ नका, असे कळविले. ‘अापण गप्पा माेठ्या मारताे, पण त्या पूर्ण करायला घरापासून सुरुवात केली पाहिजे’, असे खडे बाेल धिवरे यांनी यावेळी बैठकीत सुनावले यापुढे वेळ पाळायचा सल्लाही िदला.

दिवाळीत जवळपास अाठ दिवस उद्याेगांना सुटी असणार अाहे. या काळात सातपूर अाणि अंबड या दाेन्ही अाैद्याेगिक वसाहतींत चाेख बंदाेबस्ताचे नियाेजन गरजेचे अाहे. याकरिता उद्याेजक संघटना अाणि पाेलिस अधिकारी, सुरक्षारक्षक, कंपन्या यांच्या संयुक्त बैठकीचे अायाेजन अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन( अायमा)ने केले होते. यावेळी व्यासपीठावर अायमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे, सरचिटणीस निखिल पांचाळ, पाेलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सातपूरचे वरिष्ठ पाेलिस िनरीक्षक मनाेज कारंजे, नाईसचे रमेश वैश्य, अायमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, विवेक पाटील, राधाकृष्ण नाईकवाडे अादी हाेते. गतवर्षी याच अनुषंगाने झालेल्या बैठकीत उद्याेगांनी त्यांच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्यासारख्या सूचना पाेलिसांनी केल्या हाेत्या, त्या किती पाळल्या गेल्या हे बाेलणे याेग्य असल्याचे सांगत पाेलिसांचे बंदाेबस्ताचे नियाेजन पूर्ण झालेले असून, चाेख बंदाेबस्त ठेवला जाईल, अशी ग्वाही धिवरे यांनी यावेळी िदली. कंपन्यांनी चांगले सुरक्षारक्षक नेमणे अावश्यक असून, स्वतंत्र सुरक्षारक्षक शक्य नसल्यास ग्रुपने प्रत्येक सेक्टरमध्ये सुरक्षारक्षक ठेवावेत, राेख रक्कम कंपनीत ठेवून नये, कामगारांचा पगार बाेनसची रक्कम दिल्यानंतर त्यांना एकत्रित समूहाने जाण्यासाठी प्रवृत्त करावे, जेणेकरून चाेऱ्यांना प्रतिबंध बसेल, याकडे धिवरे यांनी लक्ष वेधले.

याप्रसंगी सरचिटणीस निखिल पांचाल यांनी सूत्रसंचालन केले आभार मानले. यावेळी माजी अध्यक्ष जे. अार. वाघ, उपाध्यक्षा नीलिमा पाटील, वरुण तलवार, उन्मेष कुलकर्णी, प्रमाेद वाघ, दिलीप वाघ, ललित बूब, विरल ठक्कर, एन. टी. गाजरे, एन. डी. ठाकरे, राजेंद्र काेठावदे अादी उद्याेजक उपस्थित हाेते.

‘निमा’ची उपस्थिती नाही
या बैठकीला नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती नसल्याने तर्क-वितर्कांना ऊत अाला हाेता. मात्र, सातपूरच्या बंदाेबस्ताकरिता निमामध्ये स्वतंत्र बैठक घेतली जाणार असल्याची माहिती एका पदाधिकाऱ्याने िदली.
दिवाळी सुटीतील बंदाेबस्ताबाबतच्या ‘अायमा’च्या बैठकीत मार्गदर्शन करताना पाेलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांसह पाेलिस अधिकारी अायमाचे पदाधिकारी.
बातम्या आणखी आहेत...