आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केबल कर वॉर जारीच; प्रशासन म्हणते, चालक नेताहेत वेळ मारून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - केबलचा करमणूक कर कोणी भरावा, याबाबत शासनाचे स्पष्ट आदेश असताना स्थानिक केबलचालक व मल्टी सिस्टिम ऑपरेटर (एमएसओ) यांचा प्रशासनाशी वाद सुरू आहेत. एमएसओ योग्य सिग्नल व सेवा देत नसल्याची खंत व्यक्त करीत केबलचालकांनी अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याकडे संयुक्त बैठकीचीही मागणी केली. मात्र, केबलचालक केवळ कर भरण्यासाठी अधिक कालावधी मिळावा म्हणून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगून पालवे यांनी नियमाप्रमाणे कर घेण्यासही सहमती दर्शविली.

कर कमी करण्यासाठी राज्य शासनास केबलचालक व एमएसओंसह कंपन्यांनी साकडे घातले आहे. महसूलमंत्र्यांनीही काही अंशी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अर्थ मंत्रालयही त्यास अनुकूल होईल, अशी आशा बाळगून केबलचालक व कंपनी चालकही नव्या धोरणानंतर कसा कर भरता येईल, यासाठी वेगवेगळी कारणे शोधत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने हा कर जिल्हा करमणूक कर विभागात भरावा आणि त्यांनी स्वीकारला नाही तर थेट न्यायालयात भरण्याचे आदेश दिले. त्यानुसार, केबलचालक कर भरण्यास गेलेही, मात्र ‘डॅश प्रणाली’ लागू केल्यानंतर लपलेली ग्राहकसंख्या समोर आली आहे. ती 56 हजारांवरून एक लाख 73 हजार झाली आहे. अजूनही सर्व सेटटॉप बॉक्स बसविलेल्यांची संख्या प्रशासनाकडे प्राप्त झालेली नाही. त्यामुळे ती वाढत जवळपास सव्वादोन लाखावर जाण्याचीही शक्यता आहे. मात्र, केबलचालक प्रशासनाकडे मार्चपूर्वीच्याच संख्येने कर भरण्याचा अट्टहास धरत आहेत. तो स्वीकारण्यास प्रशासनाने नकार दिला आहे.