आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Can Make Innovation Hub Said Dr. Vijay Bhatkar

नाशिकमध्ये इनोव्हेशन हबची क्षमता, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- -नाशिक हे उत्तम इनोव्हेशन हब होऊ शकते, त्यासाठीची क्षमताही नाशिकमध्ये आहे. मात्र, हे हब प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यादृष्टीने गुंतवणूक होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले. आज आयटी सिटी म्हणून नावारूपाला आलेल्या पुण्याच्या विकासाची सुरुवातही याच प्रकारे झाल्याचेही त्यांनी सांगितले.

इएसडीएस साॅफ्टवेअर सोल्युशन्सला पद्मभूषण प्राप्त डॉ. विजय भटकर यांनी शुक्रवारी भेट दिली असता चर्चा करताना त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. कंपनीच्या ३०० तरुण अभियंत्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी इएसडीएसचे व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमाणी उपस्थित होते. इएसडीएसने आणलेली क्लाऊड कम्युटिंगसारखी सुविधा ही आता काळाची गरज ठरणार असल्याकडे लक्ष वेधतानाच भारतीयांनी नावीन्यपूर्ण संशोधनावर भर देण्याची गरजही भटकर यांनी व्यक्त केली. सोशल मीडिया भारतीय कायद्यात यायला हवा, व्हाॅटसअॅप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियाचे सर्व्हर भारतात उभे राहिले, तर दोन कोटी लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. सोशल मीडियाचा उपयोग लोकांनीही जबाबदारीने करण्याची गरज असून, या सुविधेत सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची त्यादृष्टीने संशोधन करण्याची गरज भटकर यांनी व्यक्त केली.
विमान शास्त्राचा अभ्यास व्हावा
भारद्वाजऋषींनी भारद्वाज संहिता ग्रंथात विमानशास्त्राचा उल्लेख केलेला आहे. त्यावर शास्त्रशुद्ध संशोधन होणे गरजेचे आहे, ही माझी भूमिका असून, काळाच्या ओघात ते खरे आहे का? हेही तपासले पाहिजे. कारण, शून्याचा, बुद्धिबळाचाही शोध भारतीयांनीच लावला आहे. यामुळे विमानशास्त्राचे संशोधनही गरजेचे असल्याचे भटकर यांनी स्पष्ट केले.

इएसडीएसमध्ये रक्तचंदनाचे रोपटे लावताना डॉ. भटकर
प्लँचेटची पाठराखण नाही, मात्र...

डॉ.नरेंद्र दाभाेलकर यांच्या खुन्यांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी घेतलेल्या प्लँचेटचे मी समर्थन केलेले नाही. मात्र, विदेशातील अनेक मोठ्या देशांत किचकट प्रकरणांचा तपास करताना पोलिस मानसशास्त्रासारख्या अन्य शास्त्रांचाही आधार घेतात. प्लँचेटमागेही काही शास्त्र आहे का? याचा अभ्यास मात्र, करण्याची गरज असल्याचे मत आपण एका पुस्तक प्रकाशन समारंभात व्यक्त केल्याचे डॉ. भटकर यांनी स्पष्ट केले.