आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक बालमृत्युप्रकरणी दोषींवर करणार कडक कारवाई; डॉ. दीपक सावंत यांचे आश्वासन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गंभीर परिस्थितीत नवजात बालकांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटरचा एकही संच  राज्यभरातील एकाही शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध नसल्याचे तसेच १८ इन्क्युबेटरची क्षमता असलेल्या विशेष नवजात शिशू दक्षता विभागात ५० ते ६० नवजात बालकांवर उपचार केले जात असल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणल्यानंतर त्याची दखल घेत अारोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शनिवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्पेशल न्यू बॉर्न बेबी केअर युनिटची (एसएनसीयू) पाहणी करत या ठिकाणी इन्क्युबेटरच्या संख्येत वाढ करून  व्हेंटिलेटरची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर डॉ. सावंत यांनी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचेही संकेत दिले, तर  मृत्यू होतात हे नाकारता येणार नाही, पण मृत्यूचा दर कमी करण्याचा राज्य शासन कठोर प्रयत्न करत असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.   

गंभीर परिस्थितीत नवजात बालकांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेली व्हेंटिलेटर व इन्क्युबेटरची समस्या अतिशय गंभीर बनल्याचे ‘दिव्य मराठी’त प्रसिद्ध केले हाेते. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जयवंतराव जाधव यांनी यासंदर्भात विधान परिषदेच्या अध्यक्षांसह आरोग्यमंत्री डॉ. सावंत  यांच्याकडे बैठक घेऊन या सर्व विषयांवर माहिती दिली  होती. यानंतर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, आरोग्य संचालक सतीश पवार यांच्यासह शनिवारी अचानक कोणालाही माहिती न देता थेट जिल्हा रुग्णालयाची पाहणी करत दोषीं व्यक्तींवर कडक कारवाईचे संकेतही सावंत यांनी या वेळी दिले. 
बातम्या आणखी आहेत...