आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनसाखळी चोरणार्‍या बालगुन्हेगारांकडून 30 तोळे सोने जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको - सोनसाखळी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात अंबड पोलिसांना यश आले आहे. अंबड, इंदिरानगर, नाशिकरोड, उपनगर, पंचवटी व सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी करणार्‍या बालगुन्हेगारांकडून तब्बल 30 तोळे सोने जप्त करण्यात आले असून, यातील सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

परिमंडल दोनचे पोलिस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी व सहायक आयुक्त हेमराजसिंग राजपूत यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी ही माहिती दिली. उपनगर येथे सोनसाखळी चोरून मोटारसायकलवर पळून जाणार्‍या दोन चोरट्यांचा पाठलाग करून पकडण्यात आले होते. या चोरट्यांची कसून चौकशी केली असता ही टोळी हाती लागली. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किशोर सूर्यवंशी, उपनगर ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाबासाहेब बुधवंत, इंदिरानगर ठाण्याचे निरीक्षक महेश देविकर, उपनिरीक्षक किरण मतकर (गुन्हे शाखा, अंबड) यांच्या पथकाने आरोपींचा छडा लावून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 30 तोळे सोने व पाच मोटारसायकल ताब्यात घेण्यात आल्या.

झटपट र्शीमंत होण्यासाठी : या बालगुन्हेगारांना झटपट श्रीमंत व्हायचे होते. ते सर्व एकाच शाळेतील आहेत. यातील मुख्य आरोपी हा सुवर्ण व्यावसायिक असून, तो स्वत:च्या दुकानातच सोने जमा करीत होता. चोरीनंतर त्यांना मुंबईत जायचे होते. या टोळीचा पर्दाफाश झाल्याने सोनसाखळी चोरीच्या घटना घटल्या. या चोरट्यांकडून तब्बल 83 तोळे सोने जप्त केले असून, त्यातील 53 तोळे सोने महिलांना परत करण्यात आले आहे.