आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केमिस्टच्या बंद काळात 250 दुकाने सुरू राहणार, अन्न व औषध प्रशासनाचा दावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - औषध विक्रेत्यांनी 16 ते 18 डिसेंबर असे तीन दिवस औषध विक्री बंद ठेवण्याचे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनकाळात खासगी रुग्णालयांतील मेडिकल व इतर 250 औषध विक्री दुकाने सुरू राहणार असल्याचा दावा अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त रमेश उरुणकर यांनी केला आहे. ग्राहकांची गैरसोय झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यास त्या परिसरातील केमिस्टचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचा इशाराही मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
बंदच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेत प्रशासनाची बाजू मांडताना उरुणकर म्हणाले की, प्रशासनाकडून कायद्यातील तरतुदीनुसारच औषध विक्रेत्यांची तपासणी केली जात आहे.
आंदोलनकाळात हेल्पलाइन : रुग्णांनी 0253- 2351200/2351201 या क्रमांकांवर अथवा पुढील क्रमांकावर संपर्क साधावा : उरुणकर (09892336747, 9423225860), कातकाडे व हारक (9730085588).
100 विक्रेत्यांचे परवाने रद्द : नियमबाह्य औषधे विक्री करणार्‍या शहरातील 100 विक्रेत्यांचे ऑक्टोबरअखेरीस परवाने रद्द केल्याची माहिती उरुणकरे यांनी दिली.
‘विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावे’
औषध विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून होणार्‍या अन्यायाच्या निषेधार्थ 16 ते 18 डिसेंबर असे तीन दिवसांच्या बंदमध्ये औषध विक्रेत्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष नितीन देवरगावकर यांनी केले. केमिस्ट भवनमध्ये बैठकीत ते बोलत होते. या विरोधात नागपूर विधानभवनावर 18 डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
औषधांसाठी हेल्पलाइन : रुग्णांनी 0253-2318187 या क्रमांकावर औषधासाठी संपर्क साधावा असे आवाहन असोसिएशनचे सचिव योगेश बागरेचा यांनी केले.