आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको प्रशासकांना नागरिकांचा घेराव अतिक्रमणासंदर्भात उडवाउडवीची उत्तरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- सिडकोच्या सहाव्या योजनेतील उपेंद्रनगर परिसरात काही बेजबाबदार नागरिकांनी बांधकामाचे अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण त्वरित हटवावे, या मागणीसाठी नागरिकांनी सिडको प्रशासकांकडे तक्रारी केल्या आहेत. याबाबत सिडको प्रशासक शशिकांत भट यांना मंगळवारी घेराव घालत नागरिकांनी त्यांना जाब विचारला.
उपेंद्रनगर येथील एचआयजी बिल्डिंग येथील मोकळ्या जागेत संदीप बुधाजी चव्हाण या नागरिकाने टपर्‍या उभारल्या असून या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आहे. हे अतिक्रमित व्यावसायिक गुंडगिरी करीत असल्याचाही आरोप करत हे अतिक्रमण त्वरित हटवावे, अशी मागणी नागरिकांनी केली. यासंदर्भात सिडको प्रशासकांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या; मात्र त्याची दखल न घेतल्याने नागरिकांनी सिडको प्रशासक शशिकांत भट यांना जाब विचारण्यासाठी घेराव घातला. प्रशासकांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे नागरिक संतप्त झाले होते.
प्रशासकांचा बेजबाबदारपणा : सिडकोचे प्रशासक शशिकांत भट यांनी अतिक्रमणासंदर्भात उडवाउडवीची उत्तरे देऊन बेजबाबदार वर्तन केल्याचा सिडकोतील नागरीकांचा आरोप आहे.
अतिक्रमण हटविण्याबाबत उत्तरच नाही
सिडकोचे प्रशासक शशिकांत भट यांना नागरिकांनी सदरचे अतिक्रमण कधी काढणार, असे विचारले असता, ‘वरिष्ठ सांगतील तेव्हा काढू’, असे उत्तर त्यांनी दिले. प्रशासकांच्या वेळकाढूपणामुळे अतिक्रमण निघत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.