आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांचा खोळंबा: सिडको विभाग कार्यालय रामभरोसे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- सिडको विभागीय कार्यालयातील घरपट्टी, पाणीपट्टी, अतिक्रमण, लेखापरीक्षण, स्वच्छता, ड्रेनेज अशा सर्वच विभागांच्या कार्यालयाचा बोजवारा उडाल्याचे या वेळी निदर्शनास आले.
येथील कार्यालयाच्या कामकाजाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5.45 अशी आहे. मात्र, नागरिकांच्या माहितीसाठी कोणत्याही कार्यालयात वेळ लिहिलेली नाही. दुपारी जेवणाच्या सुटीचीही वेळ लिहिलेली नाही. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. घरपट्टी व पाणीपट्टीची बिले भरणार्‍या नागरिकांना याचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत अधिकारी व कर्मचारी त्यांच्या जागेवर उपस्थित नव्हते. त्यामुळे नागरीकांना हताश व्हावे लागले.
सुरक्षितता रामभरोसे : संपूर्ण सिडको विभागीय कार्यालयाची सुरक्षितता रामभरोसे होती. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नाहीत. कोणत्याही ठिकाणी सुरक्षारक्षक दिसले नाहीत. या महत्त्वाच्या कार्यालयात सुरक्षारक्षक नसल्यामुळे कोणीही नागरिक कधीही येत-जात होते. या कार्यालयाला मुख्य दरवाजा व तळमजल्यावर गेट दोन येण्या-जाण्याचे मार्ग आहेत.
फाइल पडलेल्या..
बहुतेक विभागात नागरिकांच्या किंवा कार्यालयीन कामाच्या फाइल उघड्या दिसल्या. त्या सुरक्षित ठिकाणी ठेवलेल्या नव्हत्या. कार्यालयात कुणीही आला आणि एखादी फाइल घेऊन गेला तर काहीही समजणार नाही, असा बेभरोसे कारभार दिसला.
कर्मचार्‍यांची कमतरता
सर्वच कार्यालयांत कर्मचार्‍यांची कमतरता आहे. काहींना बाहेर कामासाठी जावे लागते. सध्या मी या ठिकाणी प्रभारी आहे. प्रत्येक विभागाची वेळ वेगवेगळी आहे. विभागीय अधिकारी येतील तेव्हा नागरिकांना त्यांच्याकडे तक्रारी करता येतील.
-के. बी. पाडवी, प्रभारी विभागीय अधिकारी