आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्यातून एक दिवस सिडकोत होणार कपात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- सिडको विभागात आठवड्यात एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी सिडको विभागीय कार्यालयात झालेल्या नियोजन बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. यामुळे शहरात पाणीपुरवठय़ासंदर्भात नियोजन करण्याचे प्रथम पाऊल सिडको विभागाने उचलले आहे.

प्रभाग समितीच्या सभापती कल्पना पांडे यांनी या विशेष बैठकीचे आयोजन केले. बैठकीत नगरसेविका शीतल भामरे यांनी आपल्या प्रभागात दिवसाआड पाणी सोडण्याची मागणी केली होती. या बैठकीत सर्व नगरसेवकांनी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावा, अशी मागणी केली. या वेळी सिडको विभागीय अधिकारी ए. पी. वाघ, पाणीपुरवठा अधिकारी अनिल नरसिंगे, गौतम पगारे, निकम आदींसह नगरसेवक उपस्थित होते.
श्री गणेशा सिडकोतून!
सिडकोतील सर्व नगरसेवक एकत्र येत पाणी नियोजनास सिडकोतून प्रारंभ करत आहोत. सिडकोतील सर्व प्रभागात आठवड्यातील एक दिवस पाणी कपात करणार आहोत.
-कल्पना पांडे, सभापती, सिडको

वॉलमनलाही बोलवा
पाणीप्रश्नावरील नियोजन बैठकीत पालिका आयुक्त व पाणीपुरवठा विभागाचे वॉलमन यांना बोलावणे गरजेचे आहे. वॉलमनच्या बेजबाबदारपणामुळेच पाण्याचे नियोजन बिघडत आहे.
-शिवाजी चुंबळे, नगरसेवक

पाणी नियोजन गरजेचे
पाण्याचे नियोजन लवकर करण्याची गरज असून जलपर्‍याही दुरुस्त कराव्यात. पाण्याचा गैरवापर करणार्‍यांवर देखरेख पथक असावे.
-डी. जी. सूर्यवंशी, नगरसेवक


सर्वानुमते घेतलेला निर्णय मान्य
यापूर्वीच माझ्या प्रभागात दिवसाआड पाणीपुरवठा व्हावा, अशी मी मागणी केली होती. त्यानंतर संपूर्ण विभागातच नियोजन व्हावे, अशी सर्वांनी मागणी केली आहे. त्यामुळे सर्वानुमते घेतलेला निर्णय मान्य राहील. बेजबाबदारपणे पाणी वापर करणार्‍या नागरिकांवरही कारवाई सुरू ठेवावी.
-शीतल भामरे, नगरसेविका