आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखातर नाशिककरांचा स्पष्ट काैल, भाजप पहिल्याच फेरीपासून अाघाडीवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापालिका निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविल्याने नाशिकराेड येथे महिला कार्यकर्त्यांनी असा जल्लाेष केला. - Divya Marathi
महापालिका निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविल्याने नाशिकराेड येथे महिला कार्यकर्त्यांनी असा जल्लाेष केला.
नाशिक - पाच वर्षांपूर्वी नाशिककरांनी पुरवलेल्या रसदेवर मनसेचे सुसाट सुटलेले इंजिन पूर्णता यार्डात गेल्याचे चित्र असून, यंदा मात्र लाेकसभा, विधानसभेप्रमाणेच महापालिका निवडणुकीतही भाजपने सुसाट धावत इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमताद्वारे सत्ता काबीज केली अाहे.
 
महापालिकेच्या २०१२ मधील निवडणुकीत राज ठाकरे यांच्या झंझावातामुळे पालिकेत मनसेचे ४० नगरसेवक निवडून गेले, मात्र राज यांना स्वबळावर सत्ता मिळाली नव्हती. त्याचा परिणाम म्हणा की, राज यांचे दुर्लक्ष पाहता पाहता मनसेची लाट कमी झाली व पालिकेतील सत्तेचा पाच वर्षांंचा कार्यकाळ पूर्ण हाेण्यापूर्वीच ४० पैकी ३० नगरसेवकांनी मनसेला रामराम केला. दरम्यान, निवडणुकीपूर्वी मनसेने सीएसअार फंडातून केलेल्या महत्त्वाच्या कामांचा डंका पिटला. 

मात्र, सक्षम उमेदवार नसल्यामुळे मनसेची नैया डुबली. पक्षाचे पाच नगरसेवक निवडून अाले असले तरी त्यात त्यांच्या स्वत:च्या ताकदीचाच अधिक संबंध अाहे. दरम्यान, सेनेला ५० जागा मिळतील असा अंदाज असताना प्रत्यक्षात ३५ जागा  मिळाल्या. त्याचे कारण म्हणजे नऊ जागांवर एबी फॉर्मच्या गाेंधळामुळे सेनेला हार पत्करावी लागली. त्यानंतर अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी हाणामारीमुळे प्रभाग १३ मध्ये विजयाच्या मार्गावरील सेनेच्या पॅनलमध्ये फूट पडली. 

माकप, रिपाइंसह छाेटे पक्ष भुईसपाट :सिडकाे-सातपूरसारख्या कामगारबहुल भागात मार्क्सवादी पक्षाचा प्रभाव हाेता. मात्र, यंदा प्रथमच माकपला महापालिकेतून भुईसपाट व्हावे लागले अाहे. माकप गटनेते तानाजी जायभावे, माजी नगरसेविका वसुधा कराड यांचा पराभव झाला. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यासह उमेदवार पराभूत झाले. बसपने जवळपास ३६ उमेदवार दिले हाेते, मात्र त्यातील एकही विजयी झाला नाही. याव्यतिरिक्त विविध शहर विकास अाघाड्याही प्रभाव दाखवू शकल्या नाही. 
 
अाजपासून भाजप विराेधात कोर्टात लढाई 
सत्तेचा केलेला गैरवापर, मतदार याद्यांमधील गाेंधळ, ठरवून वगळलेले मतदान अाणि विशिष्ट प्रभागांत इव्हीएम मशिन्समध्ये केलेला घाेळ यामुळेच शहराला महापालिका निवडणुकीत धक्कादायक निकाल एेकायला मिळाला. खरे तर शहरातील नागरिकांनी अाणि माध्यमांनी शिवसेनेला काैल दिला हाेता.
 
मात्र राजकीय हेतूने प्रेरीत हाेत हा काैल नाकारुन भाजपने माेठ्या प्रमाणात अफरातफरी केल्याचे दिसते. एखाद्या प्रभागात इव्हीएम मशिन्स अधिक अाढळणे, एखाद्या प्रभागात २४०० मतदार असतानाही ते २७०० दिसणे अाणि त्यातही संपूर्ण मतदान भाजपला दिसणे ही बाब संशय वाढविणारी अशीच अाहे. भाजपच्या या कृत्यांविराेधात शुक्रवार (दि. २४) पासूनच अाम्ही न्यायालयीन लढाई सुरु करीत अाहाेत - अजय बाेरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना. 

पॅनलचाच बाेलबाेला
महापालिका निवडणुकीत सक्षम चेहऱ्यांच्या पॅनलची चलती हाेईल असे चित्र सुरुवातीला हाेते. मात्र, अखेरच्या टप्प्यात पॅनलपद्धत तकलादू ठरेल अशी परिस्थिती हाेती. प्रत्येक जण स्वत:चा प्रचार करीत असल्याचे बाेलले जात हाेते. प्रत्यक्षात मतदारांनी मात्र पॅनल टू पॅनल विजयी करण्याचा ट्रेण्ड दाखवला. त्याचा सर्वाधिक फायदा भाजपला झाल्याचे दिसून अाले.

भाजप पहिल्याच फेरीपासून अाघाडीवर
दरम्यान, सर्वात सुसाट भाजपने मुसंडी मारत स्पष्ट बहुमत मिळविले. महापालिकेच्या ३१ प्रभागांच्या मतमाेजणीसाठी दहा निवडणूक निर्णय अधिकारीनिहाय प्रत्येकी तीन याप्रमाणे विभागणी हाेती. यात पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक १, ४, ७, ८, १३, १६, १७, २०, २५, २७ यांची मतमाेजणी झाली. त्यात ४० जागांपैकी २२ जागा भाजपने तर शिवसेनेने १३ जागा, २ राष्ट्रवादी, २ काँग्रेस तर मनसेेने एक जागा मिळवली. त्यानंतर भाजपची विजयाची घाेडदाैड काेणालाही थांबवता अाली नाही.

थेट अाघाडी न करता केलेल्या ‘त्या’ विचित्र युतीचा मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेसला फायदा
निवडणुकीत थेट अाघाडी न करता मनसे, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रभाग १३ मध्ये केलेली विचित्र अाघाडी अखेर संबंधित पक्षांना फायदेशीर ठरली. चारही दिग्गज एकत्र अाल्यामुळे शिवसेना व भाजप पिछाडीवर गेले. अशीच परिस्थिती प्रभाग क्रमांक ५ मध्ये झाली. येथे मनसेच्या संगीता बाेडके, अपक्ष गुरुमित बग्गा, अपक्ष विमल पाटील या विजयी झाल्या, मात्र माजी नगरसेवक उल्हास धनवटे यांचा थाेडक्यात पराभव झाला.

लक्षवेधी लढती
{ नाशिकराेडला शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला भाजपचा सुरुंग
{ पश्चिम विभागात भाजप, सेनेचा बाेलबाला
{ सिडकाेत शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत
{ पंचवटीत भाजपची प्रचंड मुसंडी, 
 
शिवसेनेला एकच जागा
{ सातपूरला पाटील, जाधव, शिंदे ठरले विजयी
{ पूर्वमध्ये मजबूत पॅनल्सलाच मतदारांची पसंती
बातम्या आणखी आहेत...