आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Citizens Have Lots Expectation From Railway, Today Railway Budget

रेल्वेसंदर्भात अपेक्षापूर्तीची नाशिककरांना प्रतीक्षा,रेल्वेचा अर्थसंकल्प आज होणार सादर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - केंद्रातील आघाडी सरकारचा यंदाच्या पंचवार्षिकातील अखेरचा रेल्वे अर्थसंकल्प बुधवारी (दि. 12) सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात गत चार वर्षांपासून लालफितीत अडकून असलेल्या महत्त्वपूर्ण मागण्यांना हिरवा कंदील मिळण्याची अपेक्षा नाशिककरांतून व्यक्त होत आहे. रेल्वे अर्थसंकल्पात मोठय़ा घोषणेची शक्यता कमी असली, तरी कुंभमेळ्याच्या दृष्टीने व प्रवाशांसाठी अत्यावश्यक मागण्या पूर्ण होतील, अशी स्थिती आहे.
भुसावळ मंडलातील सर्वाधिक उत्पन्नाचे नाशिकरोड स्थानक असल्याने स्वतंत्र आरक्षण कोट्याची मागणी पूर्ण होण्याची अपेक्षा प्रवाशांना वाटत आहे.


या आहेत अपेक्षा
नाशिक ते पुणे रेल्वेमार्गाला गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली. मात्र, कामाला सुरुवात झालेली नाही. या कामाला चालना मिळावी, पंचवटी एक्स्प्रेसच्या धर्तीवर नाशिक ते मुंबई नवीन गाडी सुरू व्हावी, राज्यराणी एक्स्प्रेस भुसावळपर्यंत नेऊ नये आदी.