आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Citizens Talked With Modi In 'Chai Pe Charcha' Program

‘चाय पे चर्चा’मध्ये नाशिककरांचा मोदींसोबत संवाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संवाद साधता येणार असल्याने नाशिकमधील तीनही ठिकाणी नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली. सर्व वयोगटांतील नागरिकांनी मोदींच्या संभाषणचातुर्याला व सर्मपक उत्तर देण्याच्या हजरजबाबीपणालादेखील दाद दिली.


स्थळ - गंगापूररोडवरील सर्मथ जॉँगिग ट्रॅक: या कार्यक्रमात सहभागी होता येईल, या औत्सुक्याने प्रत्येकाच्या चेहर्‍यावर समाधान दिसत होते. अहमदाबाद येथे चहाच्या टपरीवर मोदींचे आगमन होताच याठिकाणीही ज्येष्ठ नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. मंगलोर, बंगळुरू, पाटणा येथील उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मोदी यांनी सुशासन (गुड गर्व्हनन्स) कसे असावे, काळा पैसा देशात परत आणला जाईल, यासाठी प्रसंगी कायद्यात बदल करणार असल्याचे आश्वासन दिले. प्रामाणिकपणे आयकर भरतात त्यांना पाच ते दहा टक्यापर्यंत सूट देण्याचे अथवा त्यांना बक्षीस देण्याची योजना राबविली जाईल, अशी घोषणा करतानाच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. कार्यक्रमात मोदींनी चहा पिण्यास सुरुवात करताच उपस्थित नागरिकांनाही चहाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाजप नगरसेविका तथा प्रदेश चिटणीस सीमा हिरे, माजी अध्यक्ष विजय साने, तुषार कुलकर्णी, भरत केदारी आदी उपस्थित होते.


मोदींचे विचार प्रेरणादायी
मोदी यांच्यासमवेत कार्यक्रमात प्रत्यक्ष संवाद साधला नसला तरी त्यांनी वीज, पाणी, आयकर, काळा पैसा यावर जे मत मांडले, त्यातून निश्चित ते देशासाठी काहीतरी चांगले करतील, असे वाटते. मंदाकिनी नेमाडे, नागरिक
0स्थळ कॉलेजरोडवर सलीमची टपरी - कॉलेजकन्यका आणि कॉलेजकुमारांचे घोळकेच्या घोळके नेहमीप्रमाणे ‘एक कट मारण्यासाठी’ सलीमच्या टपरीकडे वळत होते. ते ‘चायपे चर्चा नमो के साथ’ या कार्यक्रमाकडे आकर्षित झाले. जे युवक-युवती नाशिकचा प्रश्न येईपर्यंत थांबले, ते मोठय़ा औत्सुक्याने मोदींच्या या उत्तराकडे कान देऊन ऐकत होते. कॉलेजरोडवर झालेल्या या संवादाप्रसंगी नगरसेवक सुरेश पाटील, देवदत्त जोशी, गोविंद बोरसे, सुजाता करजगीकर, भारती बागुल उपस्थित होते.


0मोदी टेक्नोसॅव्ही; मात्र यंत्रणेत बिघाड : मोदी टेक्नोसॅव्ही आहेत. मात्र, सलीमच्या टपरीपाशी लावण्यात आलेल्या यंत्रणेत दोष येत असल्याने कधी चित्र गायब, तर कधी ध्वनिव्यवस्थेत बिघाड, अशा समस्या होत्या. त्यामुळे त्यांनी अभिनव प्रचारयंत्रणा राबविल्याबाबत कौतुक होत असतानाच त्याबाबत तंत्रज्ञानाच्या उणिवा उघड्या पडल्या.

उपक्रमासाठी खास बनविलेला चहा.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांसाठी करण्यात आलेले चहावाटप
नाशिकरोड : संवाद पाहण्यासाठी उपस्थित नागरिक.
पंचवटी : उपस्थित नागरिकांनी मोदींच्या संवादाला दिलेली दाद.
गंगापूर रोड : जॉगिंग ट्रॅकजवळ संवाद ऐकण्यासाठी उपस्थित नागरिक.
कॉलेजरोड : श्रद्धा पेट्रोल पंप व सलिमच्या दुकानाजवळ तरुणांची झालेली गर्दी.


संवाद न झाल्याने निराशा
‘नमो’ यांची चहाविक्रेत्यांशी चर्चा नाशिकरोडकरांनी ‘लाइव्ह’ पाहिली. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे त्यांना संवाद साधता आला नाही. त्यामुळे इच्छुकांची निराशा झाली. सुभाषरोड येथे जयंत नारद यांनी नमो पुरी भाजी सेंटर सुरू केले आहे. तेथे कार्यक्रमासाठी दोन स्क्रीन होते. या वेळी नगरसेवक संभाजी मोरुस्कर, सुनील आडके, निवृत्ती भोर, अंबादास पगारे, गजानन तितरे, राजेश आढाव, संजय घुले उपस्थित होते.