आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक शहरातील 27 वस्त्यांना पुराचा धोका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - 1 सप्टेंबर 2008 रोजी आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर पालिकेने संभाव्य आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून, यात शहरातील 27 वस्त्यांना महापुराचा तडाखा बसण्याच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून जाहीर केले आहे. पूर आल्यानंतर प्रत्येक विभागाकडे जबाबदारीचे वाटपही करण्यात आले.

यात नाशिक पूर्व विभागातील भांडीबाजार, सराफ बाजार, नेहरू चौक, गाडगे महाराज धर्मशाळा, टाळकुटे पुलाजवळील वस्ती, काझीगढी, म्हसोबावाडी, नाशिक पश्चिम विभागातील आनंदवल्ली, आसाराम बापू आश्रम, गंगावाडी, जोशीवाडा, घारपुरे घाट, मल्हारखान, पंचवटीतील गोदावरीनगर, गणेशवाडी, श्रद्धा लॉन्स, नाशिकरोडजवळील चेहडी स्मशानभूमीलगत, साठेनगर, आम्रपाली झोपडपट्टी, सुंदरनगर, नवले चाळ, सिडकोमध्ये नासर्डी नदीलगत परिसर, यमुनानगर, सातपूरमधील महादेववाडी, जगतापवाडी, कांबळेवाडी, गौतमनगर या भागांवर पुराच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून लक्ष केंद्रित केले जाणार आहे. पाटबंधारे विभागाशी पालिकेला समन्वय ठेवण्याचे आदेश दिले आहेत.