आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर हागणदारीमुक्तीचा दावा निव्वळ थाप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जगाच्या पाठीवर अापला देश स्वच्छ अाराेग्यदायी असावा, या दृष्टिकाेनातून गांधी जयंतीपासून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी माेठा गाजावाजा करीत ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्याचे अावाहन केले हाेते. त्यांच्या अावाहनाला विविध सामाजिक संस्थांच्या पाठाेपाठ महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाेरदार प्रतिसाद देत अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला अाहे. घराेघरी शाैचालय हाेऊन स्वच्छतेविषयी नागरिकांत जनजागृती व्हावी, हा त्यामागचा उद्देश अाहे. यासाठी केंद्राकडून राज्य शासनांना तेथून स्थानिक स्वराज्य संस्थांना भरघाेस निधीचे वाटप केले जात अाहे. हा निधी मिळविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून सात प्रभाग हागणदारीमुक्त झाल्याचा दावा करण्यात अाला हाेता. पालिकेने दावा केलेल्या प्रभागात ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीने प्रातिनिधिक स्वरूपात फेरफटका मारला असता, अद्याप एकही प्रभाग पूर्णपणे हागणदारीमुक्त झाल्याचे अाढळले नाही. उलट पालिकेच्या निरीक्षकांसह अाराेग्याधिकाऱ्यांकडून नागरिकांच्या डाेळ्यात कशाप्रकारे धूळफेक केली जाते, याचे दर्शन घडले.
पालिकेचादावा ठरणार फाेल?
उर्वरित५४ प्रभागही अाॅक्टाेबर २०१६ पर्यंत हागणदारीमुक्त हाेतील, असा दावा पालिका करतेय. यासाठी जाेरदार प्रयत्न सुरू असल्याचे चित्र उभे केले जात असले, तरी स्वच्छता माेहिमेमुळे फारशी प्रगती झालेली दिसत नाही. वैयक्तिक सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या कामात अनेक तक्रारी अाहेत. लाभार्थ्यांकडून बांधकामात दिरंगाई हाेत असल्याने त्यांना नाेटीस बजावण्याची वेळ पालिकेवर अाली अाहे.

स्वच्छ भारत अभियानातून ५२ काेटींची अपेक्षा
जकात एलबीटी बंद झाल्यापासून महापालिकेची अार्थिक स्थिती खालावली अाहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानातून निधीची मागणी केली जात अाहे. त्यात प्रामुख्याने १०० टक्के कचरा संकलनासाठी घंटागाडी अपेक्षित अाहे. यासाठी ३३ काेटी रुपयांची मागणी अाहे. यात माेठ्या घंटागाडीसाठी २८ काेटी, छाेट्या गाड्या खरेदीसाठी एक काेटी ३५ लाख रुपये अपेक्षित अाहेत. तसेच, दाेन यांत्रिक झाडू खरेदीसाठी तीन काेटींची मागणी पालिका प्रशासनाने केली अाहे. वैयक्तिक शाैचालय याेजनेतून नवीन मागील लाभार्थ्यांसाठी तीन काेटी ४१ लाख, तर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी १६ काेटी रुपयांची मागणी करण्यात आली अाहे.

२३३० वैयक्तिक शाैचालयांची कामे पूर्ण
शहरात झालेल्या सर्वेक्षणानुसार हजार ५२८ पैकी २३३० वैयक्तिक शाैचालयांची कामे पूर्ण झाली अाहेत. कामे पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात हजार रुपयांचे अाणि दुसऱ्या टप्प्यात हजार रुपये असे १२ हजार रुपयांचे अनुदान पालिका देत अाहेे. ज्या लाभार्थ्यांकडे शाैचालय बांधण्यासाठी स्वत:ची जागा अाहे त्यांचे कुटुंबीय उघड्यावर शाैचास जात असतील, तसेच त्यांच्या रहिवासी ठिकाणाहून ड्रेनेज लाइन गेलेली असेल अाणि त्यांची शाैचालय बांधण्याची इच्छाशक्ती असेल तर अशा लाभार्थ्यांनी महापालिकेच्या अाराेग्य विभागाशी संपर्क साधावा, असे अावाहन अाजघडीला महापालिकेच्या वतीने करण्यात येत अाहे.

अंमलबजावणी व्हावी
^पंतप्रधानांनी केलेल्या अावाहनानुसार स्वच्छ भारत अभियानात युवा पिढीने स्वत:हून पुढाकार घ्यावा. पालिका प्रशासनानेही ही याेजना कागदावरच ठेवता तिच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. - अमाेल इघे, नागरिक

हागणदारीमुक्त प्रभागासाठी शासनाचे निकष...
काेणताही प्रभाग वा शहर हागणदारीमुक्त असल्याची घाेषणा करावयाची असल्यास त्यासाठी शासनाचे काही निकष अाहेत. त्यानुसार नगरसेवक, मुख्याध्यापक, शिक्षक अाणि विद्यार्थी यांनी हागणदारीमुक्त झाल्याचा दाखल देणे अावश्यक असताे. हा दाखला मिळाल्यानंतर महापाैर, उपमहापाैर स्थायी समिती सभापती यांच्याकडून त्याबाबत पडताळणी केली जाते. त्यानंतर हागणदारीमुक्त शहरासाठी कार्यरत समिती अर्थातच अशासकीय संस्था, पत्रकार अधिकारी यांची समिती पडताळणी करून संबंधित प्रभाग हागणदारीमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देते.

वैयक्तिक शाैचालय; ७५२८ लाभार्थी निश्चित
उघड्यावर शाैचास बसणारी २८१७ कुटुंबे असून, त्यांच्यासाठी गट शाैचालयासाठी ५८० जागा लागणार अाहे. महापालिकेने सर्वेक्षण करून वैयक्तिक शाैचालयांचे हजार ५२८ लाभार्थी निश्चित केले. त्यापैकी २३३० लाभार्थ्यांचे शाैचालय पूर्ण झाले, तर ८२२ स्वच्छतागृहांचे काम बाकी अाहे. हे बांधकाम ३१ अाॅगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येेणार असल्याचे महापालिका प्रशासन सांगते.

घराेघर शाैचालयाची याेजना नावालाच

नाशिकशहरात महापालिकेच्या अाराेग्य विभागाचे कर्मचारी दाराेदार फिरून घरातील शाैचालयांच्या कामांचे सर्वेक्षण करत अाहेत. ज्यांच्याकडे शाैचालय नाही, अशा नागरिकांना शाैचालय बांधण्यासाठी अनुदान वाटप केले जात अाहे. असे असले तरी अनेक झाेपडपट्ट्यांमध्ये याबाबत पाहिजे तशी जनजागृती झालेली नाही. विशेष म्हणजे, लाेकप्रतिनिधींनीही या अभियानाकडे पाठ फिरविल्याने त्याची प्रभावी जनजागृती झालेली दिसून येत नाही.

सात प्रभाग फक्त कागदावरच हागणदारीमुक्त झाल्याचे उघड...
‘डी.बी. स्टार’ प्रतिनिधीने पालिकेने दावा केलेल्या प्रभाग ११ मध्ये सकाळच्या सुमारास प्रातिनिधिक स्वरूपात फेरफटका मारला असता तपाेवन, तसेच साधुग्राम परिसरात वसलेल्या झाेपडपट्टीतील रहिवासी उघड्यावर शाैचास जाताना अाढळले. पालिका प्रशासनाने हा अन्य सहा प्रभाग हागणदारीमुक्त झाल्याचा दावा केला खरा. मात्र, प्रत्यक्षात कागदावरच हे प्रभाग हागणदारीमुक्त झाल्याचे उघड हाेत अाहे. स्वच्छता निरीक्षकांनी अाराेग्य विभागाला सादर केलेल्या खाेट्या अहवालाची कुठलीही शहानिशा करता अाराेग्य अधिकाऱ्यांनी संबंधित प्रभाग हागणदारीमुक्त झाल्याचे घाेषित केले, हे स्पष्ट हाेते. अशीच काहीशी स्थिती अन्य प्रभागांतदेखील दिसून अाली.

शहरात ही अाहेत हागणदारीची स्थळे...
पालिकेने दावा केलेल्या प्रभागांतील काही ठिकाणांसह राजीवनगर झाेपडपट्टी परिसर, सातपूर बसस्थानकाचे माेकळे मैदान, मेरी कार्यालयालगत असलेल्या पाटाजवळील परिसर माेकळे मैदान, दादासाहेब गायकवाड सभागृहापाठीमागील परिसर, मिलिंदनगर झाेपडपट्टी परिसर, फुलेनगर, प्रबुद्धनगर, पेठराेड नाला परिसर, स्टेट बँक परिसर, संजय गांधीनगर यांसह अन्य काही ठिकाणी अाजही उघड्यावर शाैचास जाणाऱ्यांची संख्या माेठ्या प्रमाणावर अाहे.

विशेष माेहीम राबवा
^सातपूर बसस्थानक परिसरातील माेकळ्या मैदानाचा गेल्या अनेक वर्षांपासून शाैचालयासाठी वापर केला जात अाहे. महापालिकेने हागणदारीमुक्त नाशिकसाठी अशा परिसरात विशेष माेहीम राबविणे गरजेचे अाहे. - जीवन रायते, नागरिक
अधिकाऱ्यांची अाेरड
‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत गेल्या काही दिवसांपासून उघड्यावर शाैचास बसणाऱ्यांना वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहाचा लाभ दिल्यामुळे सात प्रभाग हागणदारीमुक्त झाल्याचा दावा महापालिकेच्या अाराेग्य विभागाने केला. प्रत्यक्षात मात्र अद्याप एकही प्रभाग पूर्णत: हागणदारीमुक्त झालेला नसल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाले अाहे.
निरीक्षकांनी दिलेल्या खाेट्या अहवालाची कुठलीही शहानिशा करता स्वच्छ भारत अभियानासाठी केंद्र शासनाकडून भरघाेस निधी मिळत असल्याने अाराेग्याधिकाऱ्यांनी हा दावा केल्याचे उघड झाले अाहे. अातापर्यंत पालिकेला सव्वापाच काेटींचे अनुदानही मिळाले अाहे. या संदर्भात पालिका अाराेग्याधिकारी डाॅ. विजय डेकाटे यांच्याशी चर्चा केली असता सात प्रभाग हागणदारीमुक्त झाल्याचा महापालिकेने दावाच केला नसल्याचे सांगत काेलांटउडी घेण्यात अाली. स्वच्छ भारत अभियानाच्या या अपारदर्शक कारभारावर ‘डी. बी. स्टार’चा हा प्रकाशझाेत...
डाॅ. विजय डेकाटेे, अाराेग्यअधिकारी, महापालिका
{शहरातील सात प्रभाग हागणदारीमुक्त झाल्याचा दावा तुम्ही काेणत्या निकषांच्या अाधारे केला अाहे?
-शहरातील एकही प्रभाग हागणदारीमुक्त झालेला नसून, यासंदर्भात महापालिका प्रशासनाच्या वतीने काेणत्याही प्रकारचा दावादेखील करण्यात अालेला नाही.
{अातापर्यंतकिती कामे पूर्ण झाली किती लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात अाले अाहे?
-अातापर्यंत २३३० कामे पूर्ण झालेली अाहेत. उर्वरित कामे प्रगतिपथावर असून, हजार १४८ लाभार्थ्यांना हजारांप्रमाणे प्रथम हप्ता दिला अाहे.
{नाशिकशहर पूर्णत: हागणदारीमुक्त केव्हा हाेणार?
-शहर हागणदारीमुक्त हाेण्याच्या वाटेवर असून, यासंदर्भात अामच्या नेहमीच बैठका हाेत असतात. येत्या अॉक्टाेबरपर्यंत शहर हागणदारीमुक्त करण्याचे अामचे उद्दिष्ट अाहे.
बातम्या आणखी आहेत...