आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलच्या एका क्लिकवर नाशिक अपडेट, ऑफर्स आणि घडामोडींचाही अॅपमध्ये समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मुंबई-पुण्यासारख्यामोठ्या शहरांनंतर आता नाशिक शहराचादेखील झपाट्याने विकास सुरू झाला आहे. या विकसनशील शहरामध्ये असलेल्या सोयी-सुविधांसह स्थानिक संस्कृतीबद्दल सखोल माहिती आता नाशिककरांसोबतच पर्यटकांनाही मोबाइलच्या एका क्लिकवर घेता येणार आहे. त्यासाठीच "नाशिक सिटी कनेक्ट' हे अॅप लाँच करण्यात आल्याची माहिती मानस गाजरे यांनी दिली.
शहरातील झबुझा लॅबतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत गाजरे यांनी या अँड्रॉइड अॅपविषयी माहिती िदली. या अॅपच्या माध्यमातून इव्हेंट्सपासून टुरिझमपर्यंत अशी सर्व प्रकारची माहिती मिळणार आहे. त्यामध्ये इव्हेंट्ससोबतच बाजारपेठेतील ऑफर्स, चित्रपट नाटके, परिवहन सुविधा, इमर्जन्सी ट्रान्सपोर्ट, पर्यटन आणि शहराविषयीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुगल प्ले-स्टोअरवर नाशिक सिटी कनेक्ट सर्च केल्यानंतर लगेचच मोबाइलधारकांना हे अॅप डाउनलोड करता येईल. पत्रकार परिषदेप्रसंगी योगेश बरडे, सदानंद देशमुख, प्रियंका शिंदे, अनुप्रिता देवडे आदी उपस्थित होते.
ऑफर्स शहरातविविध ऑफर्स सुरू असताना त्यांची परिपूर्ण माहिती यात मिळेल. तसेच ती मिळविण्यासाठी या सेक्शनचा योग्य वापर होणार आहे. मूव्हीज आणि ड्रामा याअॅपमध्ये मूव्हीज आणि नाटकांचे वेळापत्रक दररोज अपडेट होत असल्यामुळे आपल्याला सर्व मल्टीप्लेक्स आणि ऑडिटोरियम्समधील शोचे वेळापत्रक पाहता येईल.
ट्रान्सपोर्ट ट्रान्स्पोर्टमध्येआपल्याला शहर बससेवेसोबतच लांब पल्ल्याच्या बसेसचे संपूर्ण वेळापत्रकही उपलब्ध होईल. रेल्वेचे वेळापत्रक तसेच, टॅक्सीचे संपर्क क्रमांकही या सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत.इव्हेंट्स दररोजहोणारे इव्हेंट्स, वर्कशॉप, कार्यक्रमांची माहिती या सेक्शनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट याअॅपमध्ये शहरातील सर्व महत्त्वाचे क्रमांक उपलब्ध आहेत ज्यात रूग्णवाहिका, सर्पमित्र, चावीवाला, क्रेन सर्व्हिस आदींचा समावेश आहे.
टूरिझम यासेक्शनमध्ये जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक प्रेक्षणीय स्थळांची माहिती उपलब्ध आहे. यात प्रेक्षणीय स्थळांचे शहरापासूनचे अंतर, मार्ग, महत्त्व आणि छायाचित्रांचादेखील समावेश आहे.