आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक- पुन्हा उष्मा; तपमान कमाल 39.8, किमान 21.6 अंश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- शहरात कमाल आणि किमान तपमानात वाढ झाली असून बुधवारी (दि. ३) कमाल तपमान ३९.८, तर किमान तपमान २१.६ अंश सेल्सिअस नाेंदवण्यात अाले. दोन दिवसांपासून आकाश निरभ्र झाल्याने उन्हाची तीव्रता अधिक वाढली आहे. सकाळी आठ वाजेपासूनच उष्मा जाणवत होता. तर रात्री तपमान २१.६ असल्याने उकाडा नागरिकांची पाठ साेडत नव्हता. शहरातील तपमान पुन्हा चाळीशी ओलांडण्याची शक्यता असल्याने नागरिकांना अाधीच घाम फुटला आहे. 
 
उन्हाची तीव्रता वाढत असतानाच वाऱ्याचा वेगदेखील मंदावला आहे. त्यामुळे वातावरण पूर्णपणे दमट झाले असल्याने उकाडा वाढला आहे. येत्या आठवड्यात उन्हाची तीव्रता अधिक राहणार असल्याने कमाल तपमान ४० च्या पुढे जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 
शनिवार आणि रविवारी जिल्ह्यासह शहरात ढगाळ वातावरणामुळे लस्सी, रसवंती, आईस्क्रीमच्या दुकानात नागरिकांची गर्दी कमी झाली होती. मात्र, दोन दिवसांत उकाडा पुन्हा वाढल्याने या दुकानांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. 
बातम्या आणखी आहेत...