आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात ५८ ठिकाणी होणार गणेश विसर्जन, कृत्रिम तलाव कुंडांचीही केली उभारणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक; गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले असून, शहरात ५८ ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी गोदावरी, दारणा, नासर्डी, वाघाडी येथे विसर्जनाची व्यवस्था, तर काही ठिकाणी कृत्रिम तलाव वा कुंडांची उभारणी करण्यात आली आहे.
विभागनिहायविसर्जन स्थळे अशी : सिडको : आयटी आयपूल (गणेश घाट), डे केअर स्कूल, इंदिरानगर, चेतनानगर, गोविंदनगर सामाजिक सभागृह, जिजाऊ वाचनालय, राजे संभाजी स्टेडियम, अश्विनगर, हिरे विद्यालय, पवननगर (कृत्रिम तलाव), पिंपळगाव खांब, वालदेवी नदी घाट.

नाशिकपश्चिम : एकमुखीदत्त मंदिरालगत, सिद्धेश्वर मंदिर, घारपुरे घाट, हनुमान घाट, गाेदापार्क, जॉगिंग पार्क, लाेकमान्यनगर, चाेपडा लाॅन्स पूल, चव्हाण कॉलनी, गोदापार्कलगत परिचा बाग, फाॅरेस्ट नर्सरी पूल, दाेंदे पूल, उंटवाडीराेड म्हसाेबा मंदिर, नासर्डी पूल, येवलेकर मळा, बॅटमिंटन हाॅल, महात्मानगर पाण्याची टाकी, लायन्स क्लब, महापालिका विभागीय कार्यालय.

सातपूर: नासर्डी,सातपूर-अंबड लिंकराेड, गंगापूर धबधबा, साेमेश्वर, चांदशी पूल, अानंदवली, मते नर्सरी पूल, पाइपलाइनराेड, रिलायन्स पेट्राेलपंपाजवळ, विस्डम हायस्कूल, रामेश्वरनगर, पाइपलाइनराेड, अशाेकनगर पाेलिस चाैकी, शिवाजीनगर, सूर्या मर्फी चाैक.

नाशिकराेड: दारणानदी किनारा चेहेडी गाव, गाेदावरी नदी किनारा स्वामी जर्नादन महाराज पुलालगत दसक गाव, वालदेवी किनारा देवळालीगाव, वडनेर पंपिंग, वालदेवी किनारा विहितगाव, महापालिका शाळा क्रमांक १२५ मुक्तिधाम मैदान, शिखरेवाडी मैदान, महापालिका नर्सरी जय भवानीराेड, इंदिरा गांधी पुतळा नारायणबापू चाैक, जेलराेड.

पंचवटी: रामकुंड,म्हसाेबा पटांगण, गाैरी पटांगण, तपाेवन, कपिला संगम, नांदूर-मानूर, अाडगाव पाझर तलाव, सीतासराेवर, जाॅगिंग ट्रॅक, रामवाडी, काेणार्कनगर, गणेश मार्केट, गाेपाळनगर, वाघाडी, अारटीअाे काॅर्नर, गाेरक्षनगर, राजमाता मंगल कार्यालय, वाघाडी नदी, दत्त चाैक, किशाेर सूर्यवंशी मार्ग.

नाशिकपूर्व : कपूरथळापटांगण, राेकडाेबा तालीम, टाळकुटेश्वर मंदिर पूल, रामदास स्वामी मठ, शिवाजीवाडी, रामदास स्वामीनगर बसथांबा, साईनगर चाैफुली, किशाेरनगर, राणेनगर.