आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik City People Get Irritate Due To High Temperature

पारा ४० अंशांवर; उन्हाच्या झळांनी नाशिककर त्रस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहर परिसरात उन्हाचा कडाका उत्तरोत्तर वाढत चालला आहे. रविवारी कमाल तपमान ४० अंश सेल्सिअस असे नोंदले गेले, तर किमान तपमान २१.५ अंश सेल्सिअस असे होते. याचबरोबर सकाळी आर्द्रता ४० टक्के होती, तर सायंकाळी मात्र आर्द्रता १४ टक्के झाल्याने हवेत कोरडेपणा जाणवत होता.
गत आठवडा ढगाळ हवामान आणि बेमोसमी पावसाचा असल्याने कमाल तपमान हे २८ अंश सेल्सिअसपर्यंत आले होते, तर किमान तपमान हे १६ अंश सेल्सिअसपर्यंत आले होते. त्यामुळे नागरिकांनी रात्री गारव्याचा अनुभव घेतला. मात्र, शनिवारी कमाल तपमान थेट ३८ अंश सेल्सिअस झाले, तर रविवारी तपमानाने थेट चाळिशीच गाठली. त्यामुळे शहरवासीयांना उन्हाचा तीव्र चटका सहन करावा लागत आहे. उष्म्यामुळे सध्या उसाचा रस, मोसंबी ज्यूस आणि लस्सी-ताकांच्या स्टॉलवर नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.