आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक शहराच्या सुरक्षेबाबत धाेक्याची घंटा, पाेलिस यंत्रणा गाफील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेबाबत पाेलिस यंत्रणा पुरेशी सावध नसल्याचे चित्र ‘दिव्य मराठी’ चमूच्या चाचपणीत दिसले. शहरातील विविध स्थळांवर मारलेल्या फेरफटक्यादरम्यान संशयास्पदरीत्या टेहळणी, बेवारसपणे बॅग टाकण्यासारख्या चाचण्या घेतल्या असता, पाेलिसांनी साधे हटकलेही नाही.
सिंहस्थासाठी महापालिका, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या विविध ठेक्यांशी संबंधित परप्रांतीय कर्मचाऱ्यांचा साधुग्राम, रामकुंड परिसरात सातत्याने वावर असताना त्यांचे वर्तन, त्यांच्याकडील साहित्य वा त्यांच्या रहिवासाच्या ठिकाणांची काेणतीच पडताळणी हाेत नसल्याची बाबही समाेर अाली. अलीकडच्या काळात वाढलेल्या दहशतवादी कारवाया अाणि समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे हाेणारे प्रयत्न लक्षात घेता ‘ताकही फुंकून प्यायले तरी चालेल,’ याच एकमेव उद्देशातून ‘दिव्य मराठी’ने हे पाऊल उचलले.

जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांवर गाेळीबार करण्याच्या इराद्याने पाकिस्तानमधून अालेल्या उस्मान ऊर्फ कासिम ऊर्फ महमंद नावेद याकूबला गावकऱ्यांनी धाडस दाखवून जेरबंद केले. कुख्यात गुन्हेगार छाेटा शकील यानेही याकूब मेमनच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर भारताला धमकी दिली अाहे. या घडामाेडींचा विचार करता एक काेटीच्या अासपास भाविक येण्याची शक्यता असलेल्या कुंभमेळ्यासारख्या विशाल उत्सवात पाेलिसांना डाेळ्यात तेल घालून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार अाहेत.
सद्यस्थितीत पाेलिसांनी साधुग्राम, रामकुंड कुंभमेळ्याशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणापर्यंत पाेहोचण्यासाठी केवळ पायीच जाता येईल या दृष्टीने कडेकाेट बॅरिकेडिंग केले अाहे. मात्र, अनेक संवेदनशील ठिकाणांच्या बाबतीत म्हणावी तेवढी सतर्कता बाळगली जात नसल्याचे ‘दिव्य मराठी’च्या चाचपणीत उघड झाले.
संभाषणात अडचण... तपासणी करणार कशी?
साधुग्राममधीलरस्ते, तंबू उभारणी, तात्पुरत्या शाैचालयांचे व्यवस्थापन अशा कामांसाठी तीन हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत अाहेत. त्यात माेठ्या संख्येने परप्रांतीय अाहेत. त्यातील अनेक कर्मचाऱ्यांना मराठीच नव्हे, तर हिंदीही नीट बाेलता येत नाही. अशा स्थितीत या कर्मचाऱ्यांचे वर्तन, असल्यास गुन्हेगारी पार्श्वभूमीचे रेकाॅर्ड अन्य बाबींची माहिती पालिका पाेलिसांकडे नाही. कर्मचाऱ्यांचे बँकेत वेतन हाेण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे छायाचित्रे गाेळा केल्याचे सांगितले जाते. मात्र, अशा बनावट कागदपत्रांचा गैरकृत्यासाठी वापर करण्याचे प्रकार नवीन नाहीत. या पार्श्वभूमीवर संबंधितांची चारित्र्य पडताळणी किंबहुना त्यांच्या रहिवासाच्या ठिकाणाच्या तपासणीबाबतही याेग्य ती दक्षता घेतली जात नसल्याने भविष्यात एखादे गैरकृत्य संबंधितांकडून घडले तर जबाबदारी काेणाची, असा प्रश्न निर्माण झाला अाहे.
‘दिव्य मराठी’ची भूमिका
सिंहस्थाच्यापार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेची चाचपणी करण्यामागे पाेलिसांचे मनाेधैर्य खच्चीकरण करणे, नागरिकांमध्ये घबराट पसरवणे वा यंत्रणेच्या अकार्यक्षमतेकडे लक्ष वेधून लक्ष्य करणे असा काेणताही उद्देश नाही. महापर्वणी निर्विघ्न संपन्न हाेऊन शहराच्या लाैकिकास बाधा पाेहाेचू नये अाणि संभाव्य धाेके लक्षात अाणून द्यावेत, यासाठीच ‘दिव्य मराठी’ चमूने ही तपासणी केली.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, फोटो आणि कोठे केली तपासणी..