आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाईन फ्लूपासून बचावासाठी प्रशासनाने कसली कंबर...राज्यात गेल्या चार महिन्यांत 933 रुग्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गेल्या दाेन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस अाणि त्यामुळे वातावरणात निर्माण झालेला गारवा वरकरणी अाल्हाददायक वाटत असला तरी ताे स्वाईन फ्लू फैलावण्यास पाेषक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगितले जात अाहे. त्यामुळे स्वाईन फ्लू पुन्हा एकदा शहरात फैलावण्याची चिन्हे पाहता महापालिकेसह जिल्हा रुग्णालयांतील स्वतंत्र कक्ष सज्ज करण्यात अाले अाहेत. तसेच, अाराेग्य विभागाला सतर्कतेचा इशारा देण्यात अाला अाहे.
 
पावसासोबत साथीचे अाजार डोके वर काढत असताना, पुन्हा एकदा स्वाईन फ्लूने अापले अस्तित्त्व दाखवायला सुरुवात केली अाहे. राज्यात गेल्या चार महिन्यांत ९३३ रुग्णांना स्वाइन फ्लूची बाधा झाली आहे. यातील बहुतेक रुग्ण पुणे, अहमदनगर, नाशिक, नागपूर या भागातील आहेत.
 
पाऊस सुरू झाल्यानंतर मुंबईत एका अाठवड्यात स्वाईन फ्लूचे ९२ रुग्ण अाढळले. त्यातील तिघांचा मृत्यू झाला अाहे. राज्यात बहुतांश शहरात अशीच परिस्थिती अाहे. 
पावसाळा सुरू झाल्यानंतर एच अाणि एन विषाणूंचा प्रसार हाेण्याचे प्रमाण वाढते. त्यातून स्वाईन फ्लू फैलावताे. जशी उन्हाची तीव्रता वाढेल, तसा हा धोका कमी होत जाईल; परंतु सध्या दिवसा उष्णता आणि रात्री कमी तापमान यामुळे या विषाणूंसाठी पोषक वातावरण आहे.
 
जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांकडेही या संदर्भातील गोळ्या उपलब्ध आहेत. या आजारात ताप, सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी ही प्राथमिक लक्षणे दिसत असली तरी यंदा पसरणाऱ्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये अतिसाराचे लक्षण प्रामुख्याने दिसत आहे. त्यामुळे अतिसाराचा त्रास होणाऱ्या रुग्णांना तातडीने महापालिका रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
स्वाईन फ्लूचे रुग्ण अाढळण्याच्या शक्यतेने या आजारावरील नियंत्रणासाठी खासगी सरकारी रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा शासनाच्या वतीने देण्यात अाला आहे. डॉक्टर, आरोग्यसेविका यांना स्वाइन फ्लूची लक्षणे, औषधोपचार याविषयी सविस्तर माहिती देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, प्रशासनाच्या वतीने स्वाईन फ्लू कक्षही सज्ज ठेवण्यात अाले अाहेत. 
 
अशी घ्या काळजी 
- सर्दी-खोकला किंवा घसा दुखू लागल्यास सरकारी रुग्णालयात जाऊन तपासणी करा 
- सर्दी-खोकला असणाऱ्या रुग्णांनी तोंडाला रुमाल किंवा मास्क गुंडाळावा 
- सर्दी-खोकला असलेल्या रुग्णाने सार्वजनिक ठिकाणी मिसळू नये. 
- बाहेरून आल्यानंतर हात स्वच्छ धुऊन घ्यावेत. 
- स्वाइन फ्लूच्या संशयिताला स्वतंत्र खोलीत ठेवा 
 
जिल्हा रुग्णालयात एक रुग्ण दाखल 
जिल्हा रुग्णालयातील विशेष स्वाइन फ्ल्यू कक्षात अाता रुग्ण दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. स्वाईन फ्लू सदृश्य लक्षणे आढळून आल्याने दोन दिवसांपूर्वी एका रुग्णाला याच कक्षात दाखल करण्यात आले हाेते. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अाता स्वाइन फ्ल्यू कक्ष सज्ज केला असून, सर्व साधनसामुग्री अाैषध साहित्यदेखील सज्ज ठेवण्यात अाले अाहे. 
 
झाकीर हुसेन रुग्णालयातील स्वाईन फ्लू कक्ष सज्ज... 
-पावसाळ्याच्या काळात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढताे. सध्याही हा अाजार फैलावण्याची शक्यता अाहे. त्या दृष्टीने अाम्ही स्वाईन फ्लू कक्ष सज्ज ठेवला अाहे. ताप, सर्दी, खोकला या आजारांवर बहुतांश घरगुती उपचार केले जातात. त्यामुळे स्वाइन फ्लूचे योग्य वेळेत निदान होत नाही. रुग्णांना अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. -डाॅ. राजेंद्र भंडारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, झाकीर हुसेन रुग्णालय 
 
ग्रामीण भागात जनजागृतीचा अभाव 
ग्रामीण भागात स्वाइन फ्लूविषयी सजगतेचा असलेला अभाव, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र-उपकेंद्रातून या रोगाविषयी जनजागृतीचे प्रयत्न फारच तोकडे असल्यामुळे लोक आजाराच्या पहिल्या टप्प्यात उपचारच घेत नाहीत किंवा घेतला तरी खासगी रुग्णालयात घेतात. फारच कमी रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत पोहचतात. जिल्ह्यात केवळ कळवण मालेगाव येथेच निदान प्रयोगशाळा असून, नाशिक शहरात कथडा बिटको रुग्णालयात या सुविधा आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...