नाशिक; मंत्रालयात बाेलावून नाशिकच्या लाेकप्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांबराेबरच बैठक घेण्याचे खाेटे अाश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याचा अाराेप करीत शिवसेना गटनेता अजय बाेरस्ते यांनी अाता येत्या काळात शहरावरील गडद हाेणारे पाणी संकट लक्षात घेता, उपलब्ध साठ्याचे काटेकाेर नियाेजन करण्यासाठी विशेष महासभा घेण्याची मागणी केली. सत्ताधारी मनसेही विशेष महासभेसाठी अनुकूल असून, या महासभेतही भाजप विराेधात सर्वपक्षीय, असा सामना रंगण्याची चिन्हे अाहेत.
बाेरस्ते यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत भाजपवर जाेरदार हल्लाबाेल केला. हा राजकारणाचा विषय नसून, नाशिकमधील पाण्यासाठी सर्वपक्षीय लाेकप्रतिनिधी एकत्र झाले अाहेत. या लाेकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांना नाशिकमधील पाण्याच्या गंभीर संकटाबाबत सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून मराठवाड्यासाठी पाणी साेडले गेले. अाता मंत्रालयात बैठक घेऊन नाशिकच्या वाट्याला २७०० दशलक्ष घनफूट पाणी दिले असून, जुलै महिन्यापर्यंत हे पाणी पुरवावे लागणार अाहे.
मुळात जे पाणी दिले त्यात बाष्पीभवन, गळती अन्य बाबी लक्षात घेता जेमतेम २००० हजार दशलक्ष घनफूट पाणी मिळेल की नाही, याविषयी शंका अाहे. त्यामुळे अाता नाशिककरांवर लादलेल्या पाणी संकटाचा सामना करण्यासाठी विशेष महासभा घेऊन महापालिकेने नियाेजन करणे गरजेचे असल्याचे बाेरस्ते यांनी सांगितले. त्यात पाण्याचे नवीन स्त्राेत, शहरातील विहिरा अधिग्रहण, हातपंपांची दुरुस्ती, जलतज्ज्ञांच्या सूचना अादींविषयी ऊहापाेह करणे अावश्यक अाहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी प्रादेशिक मुद्दा करीत नाशिककडे दुर्लक्ष केल्याचा अाराेप करीत याच नाशिककरांनी भाजपचे तीन अामदार माेठ्या विश्वासाने निवडून दिल्यानंतरही अशी दुर्दैवी भेट दिली गेल्याचा टाेलाही लगावला. राजकीय अाकसापाेटी नाशिककरांची काेंडी करण्याचा प्रयत्न शिवसेना हाणून पाडेल, असेही सांगितले.
शिवसेना करणार विद्यार्थ्यांमध्ये जागृती
जुलैपर्यंत पाणी पुरवण्यासाठी शहर परिसरातील नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जागृती हाेणे गरजेचे अाहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रत्येक विद्यार्थ्याला पाणी बचतीचे धडे देण्यासाठी एक पुस्तिका करणार अाहे. विद्यार्थी जागरूक झाले, तर संपूर्ण घर जागरूक हाेईल, असेही बाेरस्ते यांनी स्पष्ट केले.