आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी विलास पाटील कायम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - तीन दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या बदलीचे आदेश अखेर सोमवारी रद्द झाले असून, नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी ते कायम राहणार आहेत. पाटील यांची 19 महिन्यांतच तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी नियुक्ती केलेले जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन यांची उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


आदिवासी आयुक्तपदी डॉ. संजीव कुमार
नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तपदी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. संजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2003च्या बॅचचे ते अधिकारी आहेत.