आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण मंडळाची निवडणूक 16 ऑगस्टला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महापालिका शिक्षण मंडळाच्या 13 जागांसाठी 16 ऑगस्टला निवडणूक जाहीर झाली आहे. 16 जुलैपासून अर्जवाटप होणार असल्याची माहिती महापौर अँड. यतिन वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
महापौर निवडणुकीनंतर तीन महिन्यात ही निवडणूक व्हावी, असे शासनाचे आदेश असले तरी विधान परिषद आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे ही निवडणूक लांबणीवर पडली होती.
16 जुलैपासून अर्जांचे वितरण करण्यात येणार आहे. 31 जुलैपर्यंत 11 ते 2 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. 8 ऑगस्टला छाननी होणार असून 16 ऑगस्टला मतदान होणार आहे. शिक्षण मंडळात अनुसूचित जाती-जमातीचे दोन, दहावी व तत्सम शैक्षणिक पात्रता असलेले तीन, सर्वसाधारण आठ, शासननियुक्त दोन आणि शिक्षणाधिकारी एक अशा 13 जागा असून या निवडणुकीसाठी सर्व नगरसेवक मतदार असतील.