आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवक संजय साबळे म्हणतात, गुन्हेगारांशी संबंध नाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मोहन चांगले व दीपक सोनवणे खून प्रकरणात पोलिसांना शरण आलेला संशयित आरोपी अर्जुन पगारे याचा आणि आपला कुठलाही संबंध नाही, असा दावा नगरसेवक संजय साबळे यांनी केला आहे.

दुहेरी हत्याकांडात पगारे पोलिसांना शरण आल्याने त्यास अटक करण्यात आली. किशोर घाटे व नगरसेवक साबळे यांनी पगारे यास हजर केल्याच्या वृत्ताचे साबळे यांनी खंडन केले आहे. आपला आणि पगारेचा कुठलाही संबंध नाही. त्यास न्यायालयात हजर करण्याचा प्रश्नच नसून कुठल्याही गुन्हेगारांशी संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना शासन योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मेळाव्याच्या आयोजनात आपण व्यस्त होतो. सर्वांना एकत्रित आणून डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून मेळाव्याचे आयोजन होणार असल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.