आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक महापालिकेचा आर्थिक संकटांकडे डोळेझाक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक स्थिती बेताची असलेल्या महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असताना दुसरीकडे प्रशासन मात्र उत्पन्नाच्या मुख्य स्रोतांकडेच डोळेझाक करीत आहे. शहरात साडेतीन लाखावर मिळकती असताना निम्म्याहून अधिक मिळकतींचा करच वसूल होत नसल्याची बाब समोर आली आहे.

महापालिकेला जकात, घरपट्टी व पाणीपट्टीपासून जवळपास 80 टक्के इतके उत्पन्न मिळते.विकासकामांबरोबरच नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेसाठी हिश्शाची रक्कम खर्च करावी लागल्याने पालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेच्या मिळकतींचे भाडे बाजारमूल्यानुसार आकारणे, मोकळ्या भूखंडांवर कर यासह उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. दुसरीकडे अनेक मिळकतींवर मेहरबानी केली जात आहे. शहरात तीन लाख 42 हजार 643 करपात्र मिळकती असून, 13 हजार 74 मिळकती अनधिकृत आहेत. अधिकृत साडेतीन लाख मिळकतींमध्ये नळजोडणी मात्र मिळकतींच्या निम्मी म्हणजे अवघी एक लाख 68 हजार 984 (मिळकतींच्या 42 टक्के) आहे. निम्म्या मिळकतींसह अनधिकृत मिळकतींपासून महापालिकेला करच मिळत नसल्याचे उघड झाले आहे.

विभागनिहाय नळजोडणी
विभाग नळजोडणी
नाशिक पूर्व 26077
नाशिक पश्चिम 9732
पंचवटी 32660
नाशिकरोड 26743
सातपूर 23286
सिडको 50545

42 टक्केच पाणीपट्टी वसूल
42 टक्के मिळकतींपासूनच कर मिळत असल्याची बाब निदर्शनास आणून देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याने पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. गुरुमितसिंग बग्गा, गटनेते, शहर विकास आघाडी

कर वसुलीत मोठा भ्रष्टाचार
मिळकत कर वसुलीत मोठा गैरव्यवहार होत आहे. कर वसूलपात्र मिळकतींचे क्षेत्र कमी दाखवून कर दरामध्ये मोठी सूट दिली जात आहे. वर्षाला पालिकेस 225 कोटींचा महसूल मिळू शकतो. सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेता