आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Corporation Issue On Phalake And Tarangan Privatization

फाळके स्मारक आणि तारांगणच्या खासगीकरणाबाबत एकाच पक्षात दोन मते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - फाळके स्मारक, तारांगण, खत प्रकल्प व अन्य काही महत्त्वांच्या कामांचे खासगीकरण करण्याच्या निर्णयावरून सत्ताधारी भाजपातील मतभेद उफाळून आले असून, खासगीकरणाला माजी उपमहापौर देवयानी फरांदे यांनी विरोध दर्शवला असताना विद्यमान उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी मात्र पक्षाची भुमिका अद्याप ठरलेली नसून फरांदे यांचे व्यक्तिगत मत असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे.
लोकप्रतिनिधींच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या खासगीकरणावरून आता राजकीय पक्षातही विविध प्रकारचे मतप्रवाह दिसून येत आहे. सर्वानुमते जकात खासगीकरण रद्द झाले असले तरी, हीच खासगीकरणाची प्रक्रिया मात्र पालीकेच्या अन्य प्रकल्पांसाठी लागू करण्यासाठी हालचाली जोर धरत आहे. त्यामुळेच स्थायी समितीच्या सभेत काही महत्त्वाच्या प्रकल्पांची खासगीकरणाद्वारे देखभाल करण्याचा प्रस्ताव समंत करण्यात आला. यास सर्वपक्षीय गटनेत्यांनी विरोध केला असून भाजपच्या वतीने माजी उपमहापौर देवयानी फरांदे यांनीही कडाडून विरोध दर्शवला होता.
खासगीकरणाला भाजपकडून नेहमीचच विरोध राहिला असून खत प्रकल्प आदर्श असल्यामुळे खासगीकरणाचा प्रश्नच येत नसल्याची भूमिका फरांदे यांनी मांडली होती. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना उपमहापौर कुलकर्णी यांनी मात्र फरांदे यांचे व्यक्तिगत मत असून भाजपची भूमिका ठरली नसल्याचे स्पष्ट केले. भाजपची भूमिका सर्वांना विचारात घेवून ठरवली जाईल व योग्यवेळी जाहीर केली जाईल असेही ते म्हणाले. प्रत्येकाला व्यक्तिगत मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे; मात्र याचा अर्थ ते पक्षाचे मत होत नाही असाही टोला त्यांनी लगावला.