आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपनगर येथील पालिकेच्या वास्तू दुर्लक्षित, रहिवाशांची होतेय गैरसोय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- उपनगर परिसरात सर्वसामान्य, उच्चभ्रू, तसेच शासकीय कर्मचार्‍यांची संख्या मोठी आहे. येथील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात महापालिकेने परिसरातील नागरिकांकरिता सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी समाजमंदिर, तसेच अभ्यासिकाही उभारलेली आहे. मात्र, संजय गांधीनगर येथील रमाई बहुद्देशीय सभागृह आणि अयोध्यानगर येथील अभ्यासिका वर्षभरापासून बंद स्थितीत असल्याने या इमारती धूळखात पडून आहेत. त्यामुळे महापालिकेचा लाखो रुपयांचा खर्च वाया जात असल्याची स्थिती आहे.

संजय गांधीनगर परिसरात रमाई बहुद्देशीय सभागृहाची देखणी इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पुढार्‍यांच्या राजकारणामुळे येथे वर्षभरापासून कोणतेही कार्यक्रम होत नाहीत. त्यामुळे ही इमारत वापराविना पडून आहे. या इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आलेल्या असून, इमारतीचा परिसर रात्री मद्यपान करण्यासाठी हक्काची जागा झाली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेली अयोध्यानगरमधील अभ्यासिकाही बंद असल्याने येथील विद्यार्थ्यांना तिचा उपयोग नाही. महापालिकेने याबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी अपेक्षा परिसरातील रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.